शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : पाेलिसांनी रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात चालकास अटक करण्यात आली असून, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : पाेलिसांनी रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात चालकास अटक करण्यात आली असून, मालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. ही कारवाई कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी-कळमना मार्गावर गुरुवारी (दि. २४) दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कामठी-कळमना मार्गावर एमएच-४०/बीएल-७८३३ क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. संशय आल्याने पाेलिसांनी हा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये रेती असल्याचे निदर्शनास येताच कागदपत्रांची कसून तपासणी केली. त्यात ती रेती विना राॅयल्टी असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकचालक अनिल रामराव राऊत (२६, रा. बालाजी नगर, साबळे ले-आऊट, येरखेडा, ता. कामठी) यास अटक केली. त्याच्याकडून ट्रक आणि साडेसात ब्रास रेती जप्त केली. याप्रकरणी ट्रकचालकासह ट्रक मालक रमेश कारेमाेरे (५६, रा. रनाळा राेड, न्यू येरखेडा, ता. काटाेल) याच्याविरुद्ध भादंवि ३७९, ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, ट्रकचालकास न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक विनायक आसटकर यांनी दिली. ही कारवाई बीट मार्शल पंकज गुप्ता व संदेश शुक्ला यांच्या पथकाने केली.