शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीचा टिप्पर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पाेलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान उमरेड शहरालगतच्या बायपास राेडवर कारवाई करीत, रेतीची विनाराॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : पाेलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान उमरेड शहरालगतच्या बायपास राेडवर कारवाई करीत, रेतीची विनाराॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारा टिप्पर पकडला. यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून एकूण १५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.१५) मध्यरात्री करण्यात आली.

उमरेड पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना उमरेड परिसरातून नागपूरच्या दिशेने रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी उमरेड शहरालगतच्या बायपास राेडवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात त्यांनी नागपूरच्या दिशेने जात असलेला एमएच-४९/एटी-०९९३ क्रमांकाचा टिप्पर थांबवून झडती घेतली. त्या टिप्परमध्ये रेती आढळून येताच, कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ती रेतीची विनाराॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी रेतीसह टिप्पर ताब्यात घेतला.

या कारवाईमध्ये टिप्पर चालक महेंद्र भाेलानाथ (३८, रा.चांपा, ता.उमरेड), वाहक संदीप अभिमन्यू फाेंडे (३५, रा.चांपा, ता. उमरेड) व मालक नितीन भाऊराव बनकर (४०, रा. वकीलपेठ, नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला. या कारवाईमध्ये १५ लाख ३० हजार रुपयांचा टिप्पर व २० हजार रुपयांची रेती असा एकूण १५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार यशवंत साेलसे यांनी दिली असून, त्या टिप्परमध्ये तीन ब्रास रेती अतिरिक्त असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास ठाणेदार यशवंत साेलसे करीत आहेत.