शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गुरांच्या वाहतुकीचे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:09 IST

नरखेड : पाेलिसांच्या पथकाने नरखेड परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात आराेपीस अटक ...

नरखेड : पाेलिसांच्या पथकाने नरखेड परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात आराेपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून वाहन आणि जनावरे असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय, वाहनातील नऊ जनावरांची सुटका केली. ही कारवाई शनिवारी (दि. १३) दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

मुरलीधर शेषराव भाेयर (२९, रा. थुगाव निपाणी, ता. नरखेड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी वाहनचालकाचे नाव आहे. नरखेड पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नरखेड परिसरातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी नरखेड परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, यांनी एमएच-४०/बीजी-३४०२ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली. त्या वाहनात पाेलिसांना नऊ जनावरे काेंबली असल्याचे आढळून आले.

कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनचालक मुरलीधर भाेयर यास अटक केेली. शिवाय, वाहनातील नऊ जनावरांची सुटका करून त्यांना नजीकच्या गाेरक्षणामध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. या कारवाईमध्ये दाेन लाख रुपये किमतीचे वाहन आणि ३५ हजार रुपयांची नऊ जनावरे असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी पाेलीस उपनिरीक्षक अरुण खुटेमाटे, दिनेश वरठे, हेमंत राठाेड, गाैरव बकाल, विश्वनाथ ढाेणे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पथकाने केली.