शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ‘कॅट’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

सणासुदीत भारतात विक्रीस येणाऱ्या सर्व चिनी वस्तूंची देशात विक्री न करण्याचे आवाहन देशातील ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यापाऱ्यांना आणि खरेदीवर प्रतिबंध आणण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२९ ऑगस्टला दिल्लीत बैठकभारतीय उद्योजक व ग्राहकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानच्या समर्थनात उतरलेल्या चीनमधील उत्पादनांवर १ सप्टेंबर २०१९ पासून बहिष्कार घालण्याचा इशारा कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) दिला आहे. या संदर्भात सर्व राज्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २९ ऑगस्ट रोजी दिल्लीत बोलविल्याची माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी दिली. देशात ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यावसायिक असल्याचे त्यांनी सांगितले.काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सर्व राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिला, मात्र चीनने पाकिस्तानला समर्थन दिले. त्यामुळे सणासुदीत भारतात विक्रीस येणाऱ्या सर्व चिनी वस्तूंची देशात विक्री न करण्याचे आवाहन देशातील ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यापाऱ्यांना आणि खरेदीवर प्रतिबंध आणण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात येणार आहे. या संदर्भात कॅटच्या देशभरातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक २९ ऑगस्टला दिल्लीत होणार आहे. बैठकीनंतर १ सप्टेंबरपासून चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला जाईल, असे भरतीया म्हणाले. चीनऐवजी भारताने बांगला देशासारख्या लहान आणि कमी विकसित देशांशी व्यवहार वाढविले पाहिजे, असे आवाहन बैठकीत करण्यात येणार आहे.चीनची सर्वात मोठी बाजारपेठ भारतात आहे. देशात सन २०१७-१८ मध्ये चीनहून ९० बिलियन डॉलर्सच्या वस्तूंची आयात झाली होती. आता मात्र चीनचा व्यापार धोक्यात सापडला आहे. आपली अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून असतानाही चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहात आहे. त्यामुळे भारतीयांनी चीनला धडा शिकवावा, असे आवाहन भरतीया यांनी केले.चीनमध्ये निर्मित वस्तूंवर भारताने ३०० ते ५०० टक्के आयात शुल्क लावावे. त्यामुळे चीनच्या वस्तू भारतात येणार नाहीत. चीनमधून ज्या वस्तू आयात करण्यात येतात, त्या वस्तू भारतातच तयार करण्यासाठी भारतीय उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे. विविध खेळणी निर्मितीसाठी लघु उद्योजकांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. घरगुती वापरातील स्वस्त आणि गुणवत्ता नसलेल्या वस्तू भारतात येतात याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे भरतीया यांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजार