शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक केंद्रांमध्ये व्हावेत हृदयरुग्णांवर आकस्मिक उपचार

By admin | Updated: September 29, 2014 01:02 IST

बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकाराचा झटका आलेल्यांवर उपचारच होत नाही. रुग्णाला मोठ्या इस्पितळाकडे पाठविले जाते. परिणामी २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. देशात वाढत्या

विदर्भ हृदयरोग संघटनेचा पदग्रहण सोहळा थाटातनागपूर : बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकाराचा झटका आलेल्यांवर उपचारच होत नाही. रुग्णाला मोठ्या इस्पितळाकडे पाठविले जाते. परिणामी २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. देशात वाढत्या हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मिक सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ (दिल्ली) डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी येथे केले.डॉ. के.जी. देशपांडे स्मृती व्याख्यान व विदर्भ हृदयरोग संघटनेचा पदग्रहण सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. रेड्डी म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांमधील ७० टक्के लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. हृदयरोगापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तंबाखुचे व्यसन, धूम्रपान, स्थूलतेचे प्रमाण या बाबी टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, शरीरातील चरबीचे प्रमाण, मधुमेह आदी बाबींवर नियंत्रण राखले पाहिजे. त्यासाठी नियमित व्यायाम, नियंत्रित वजन, पोषक जीवनशैली करत राहिलो तर औषधे घ्यावी लागणार नाहीत. परंतु सध्याच्या घडीला जोपर्यंत आजार होत नाही तो पर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दुसरीकडे देशात हृदयरोगाच्या आकस्मिक सेवेचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यात महत्त्वाचे निर्णय होणे आवश्यक आहे. हृदयरोगाचे रुग्ण कमी करण्यासाठी गावपातळीवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि आशा वर्कस यांच्याकडून हृदयरोगाप्रति जनजागृती होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया, विदर्भ शाखेचा सत्र २०१४-१५ साठी पदग्रहण सोहळा थाटात पार पडला. नवनियुक्त अध्यक्ष डॉ. शंतनू सेनगुप्ता, सचिव डॉ. पवन अग्रवाल यांनी शपथ घेतली. यावेळी मंचावर डॉ. रेड्डी, मुंबईचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. भरत दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. (प्रतिनिधी)