शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

महिलांच्या गुलामगिरीवरच जातीव्यवस्था टिकून

By admin | Updated: April 12, 2016 05:29 IST

या देशातील जातीव्यवस्था, विषमता, लिंगभेद, असमानता ही महिलांच्या गुलामगिरीवर अवलंबून आहे. महिला ज्या

नागपूर : या देशातील जातीव्यवस्था, विषमता, लिंगभेद, असमानता ही महिलांच्या गुलामगिरीवर अवलंबून आहे. महिला ज्या दिवशी ही गुलामगिरी तोडून स्वतंत्र होतील, त्या दिवशी या देशातील हा सर्व भेदाभेद दूर होईल, असे रोखठोक प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वैशाली डोळस यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य संयुक्त नागरी जयंती समारोह समिती आणि डॉ. आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे वैचारिक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांना समर्पित विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी अध्यक्षस्थानी होते, तर मराठा सेवा संघ महाराष्ट्राचे समन्वयक श्रीमंत शिवाजी कोकाटे प्रमुख अतिथी होते. अ‍ॅड. डोळस म्हणाल्या, या देशातील जातीव्यवस्था, विषमता टिकून राहावी म्हणूनच महिलांना येथील धर्मव्यवस्थेने गुलाम करून ठेवले आहे. त्यामुळे महिलांच्या स्वातंत्र्याचा जेव्हा जेव्हा प्रश्न उभा राहतो, तेव्हा तेव्हा येथील सनातनी लोक खवळून उभे राहतात. फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांमुळे महिलांमध्ये आज इतकी ऊर्जा आली आहे की, त्यांना देवसुद्धा घाबरायला लागले आहेत. आता जातीभेद राहिला नाही. महिलांनाही सन्मानाची वागणूक दिली जाते. परंतु शनिशिंगणापूरच्या विषयाने या देशातील भेदभाव पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आला आहे, असेही त्यांनी सांगितले. श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी आपल्या भाषणात या देशातील धर्मव्यवस्थेमुळे बहुजनांचा विकास खुंटला आहे, तेव्हा देशातील बहुजनांनी धर्मव्यवस्था नाकारून विकासाची कास धरावी, असे आवाहनही केले. नागेश चौधरी यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रास्ताविक डॉ. नीरज बोधी यांनी केले. संचालन डॉ. सुचित बागडे यांनी केले. दरम्यान अशोक स्वरस्वती यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)आज ‘अल्पसंख्यांक’ या विषयावर परिसंवाद ४१२ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर अल्पसंख्यांक या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात अ.भा. ख्रिश्चन परिषदेचे महासचिव डॉ. जॉन दयाल, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, इरफान अली इंजिनियर आणि प्रो. डॉ. दीपक कुमार प्रमुख वक्ते राहतील.