शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान

By योगेश पांडे | Updated: October 11, 2024 00:07 IST

मूळ कॅडरच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्याची सूचना.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने भाजपकडून मायक्रो लेव्हलवर नियोजन करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भाजपच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील १२ मतदारसंघातील नियोजन व तेथील सामाजिक समीकरणांच्या दृष्टीने संघाकडून जाणून घेण्यात आले. भाजपकडून दुर्लक्ष करण्यात येत असलेल्या काही बाबींवर यावेळी संघाकडून कान टोचण्यात आले. विशेषत: राज्यात जातीय समीकरणांचे गणित जुळविणे तर बरोबर आहे, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका अशी सूचना यावेळी करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्या मार्गदर्शनात ही बैठक झाली. यात संघाशी जुळलेल्या काही संस्थांचे पदाधिकारी व भाजपचे जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. भाजपमध्ये तिकीट कुणाला द्यावे तो तुमचा प्रश्न आहे. मात्र मूळ कॅडरच्या कार्यकर्त्यांकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. त्यांनी पक्षाला इथपर्यंत आणले आहे याचा विसर पडू देऊ नका असे लिमये यांनी सांगितले. यावेळी संघाकडून जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतील सामाजिक समीकरणांचा आढावा घेण्यात आला. अनेक कार्यकर्ते लोकसभेत गाफील राहिले. त्यांना सक्रियपणे कामाला लावा. तसेच सोशल माध्यमांवर केवळ लाईक करून चालणार नाही. त्यावर कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांकडून आरक्षणावरून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अशा विषयांना तथ्यांवर आधारित उत्तरे देत जनतेतील संभ्रम दूर करण्यावर भर द्यावा, अशी सूचना संघाकडून करण्यात आली.

मताधिक्य असलेल्या बुथवरील मतदान टक्का वाढवालोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होते, तेथील मतदानाची टक्केवारी ४० ते ४५ टक्के इतकी होती. तर जिथे भाजपला मताधिक्य नव्हते तेथे मतदानाचा टक्के ६० टक्का दिसून येत होता. प्रभाव असलेल्या भागातील लोक हव्या त्या प्रमाणात बाहेर निघाले नाही किंवा भाजपला त्यांना मतदानकेंद्रांपर्यंत नेता आले नाही. मताधिक्य असलेल्या बुथवरील मतदान टक्का वाढवा व तो ६० टक्क्यांवर न्या असे गणितच संघाकडून मांडण्यात आले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ