शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

कॅशलेस आरोग्य योजना शिक्षकांना लागू करणार

By admin | Updated: September 10, 2016 02:27 IST

पोलिसांप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी, अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून शिक्षकांची आहे.

शिक्षण आयुक्त : समायोजनासंदर्भात बोलणे टाळले नागपूर : पोलिसांप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी, अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून शिक्षकांची आहे. येत्या दोन महिन्यांत कॅशलेस आरोग्य कुटुंब योजना शिक्षकांनाही लागू करण्याचे आश्वासन शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी दिले. शिक्षकांच्या विभागीय कार्यशाळेसाठी धीरजकुमार नागपुरात आले असता, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने त्यांना नागपूर विमानतळावर निवेदन देण्यात आले. शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांना एखादा दुर्धर आजार झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत शस्त्रक्रिया करायची असल्यास, शिक्षकांना स्वत: खर्च करावा लागतो. झालेल्या सर्व खर्चाचे बिल व तपशील जोडून परताव्यासाठी शिक्षण विभागाकडे पाठवावा लागतो. आरोग्यावर झालेल्या खर्चाचा परतावा मिळण्यासाठी शिक्षकांना बराच कालावधी लागतो. इच्छा नसताना लाचही द्यावी लागते. शिक्षकांना त्यासाठी बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना सुरू करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे सरकारला वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे. या मागणीला घेऊन संघाचे विभागीय अध्यक्ष खेमराज खोडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्याशी नागपूर विमानतळावर भेट घेतली. त्यांच्याशी आरोग्य योजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यांनी येत्या दोन महिन्यात कॅशलेस आरोग्य योजना शिक्षकांना लागू करणार असल्याचे आश्वासन दिले. परंतु सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेत असलेला अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या विषयावर फारसे बोलणे टाळले. यावेळी संघाचे नरेश भोयर, मो. आदिल शेख, ज्ञानेश्वर चंदनखेडे, ओमप्रकाश ढाबेकर, देवेंद्र सोनटक्के, प्रवीण आंभोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)१४ सप्टेंबरपर्यंत समायोजनाची प्रक्रिया होणार असल्याची चर्चागेल्या दोन दिवसांपासून शिक्षकांच्या समायोजनाची संपूर्ण प्रक्रिया ठप्प आहे. नागपुरात १० व ११ सप्टेंबर या दोन दिवसात विभागीय शैक्षणिक कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला शिक्षण आयुक्त धीरजकुमार, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे उपस्थित राहणार आहेत. समायोजनाच्या विषयावरून कार्यशाळेत शिक्षकांकडून कुठलाही त्रागा होऊ नये म्हणून १४ सप्टेंबरपर्यंत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होईल अशी चर्चा व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू आहे. परंतु अधिकाऱ्यांकडून याला दुजोरा मिळालेला नाही.