शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

एटीएम कॅश व्हॅनमधून 14 लाखांची रोकड लंपास

By admin | Updated: July 12, 2017 22:24 IST

शहरातील अतिशय वर्दळीचा झांशी राणी चौकातील बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील १४ लाख रुपये रोख रक्कम असलेली

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 12 - शहरातील अतिशय वर्दळीचा  झांशी राणी चौकातील बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील १४ लाख रुपये रोख रक्कम असलेली पेटी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडलेल्या
या घटनेची पोलिसंना अतिशय उशिरा माहिती देण्यात आली. बंदुकधारी सुरक्षा गार्ड उपस्थित असतांना ही चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसही या घटनेमुळे हादरले आहे. बँकेच्या कर्मचाºयांची विचारपूस केली जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बँक आॅफ इंडियाने एका खासगी कंपनीला (एसआयएससी) त्यांच्या एटीएममध्ये रोख रम्मक जमा करण्याचे काम दिले आहे. एसआयएससी कंपनीचा कस्टोडडियन कर्मचारी नीलेश दारोटे (१८) हा आपला एक सहकरी, सुरक्षा
गार्ड आणि वाहनासह मंगळवारी दुपारी दुपारी १.३० वाजता बँक आॅफ इंडियाच्या किंग्सवे येथील विभागीय कार्यालयातून १ कोटी ५ लाख रुपयाची रोख रक्कम घेऊन व्हॅन क्रमांक एम.एच. १९/बीएम/१२६३ ने निघाले. त्यांना ही रक्कम शहरातील विविध एटीएममध्ये भरावयाची होती. विभागीय कार्यालयातून निघून ते रिझर्व्ह बँक चौकातील इलाहाबाद बँकेच्या एटीएममध्ये पोहोचले तिथे पैसे भरल्यावर ते गोळीबार, चौक, अग्रसेन चौक, रेशिमबाग चौक, भांडे प्लॉट चौक, कळमना,  क्वेटा कॉलनी, वैशालीनगर, सुगतनगर, जरीपटका, कडबी चौक मार्गे कळमेश्वरला गेले. कळमेश्वरवरून परत आल्यावर शंकरनगर चौकातील एटीएममध्ये
रुपये भरले. यानंतर सायंकाळी ६.३० वाजता झाशी राणी चौक येथील येथील एटीएमजवळ आले. झाशी राणी चौकातील एटीएममध्ये ५ लाख रुपये भरल्यानंतर त्यांना बुटीबोरीच्या एटीएममध्ये १४ लाख रुपये जमा करायचे होते. तिथे गेल्यावर व्हॅनमधील स्ट्राँग रुममध्ये  ठेवलेली नोटांची पेटी गायब होती. त्यांनी आपल्या अधिकाºयांना माहिती दिली. यानंतर रात्री १०.३० वाजता
धंतोली पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.  पपोलिसांना एसआयएससी कर्मचारी निलेश दरोटे याने दिलेल्या माहितीवर संशय आला. त्यामुळे पोलीस दरोटे व इतर कर्मचाºयांना सक्तीने विचारपूस केली. परंतु कुठलीही माहिती न मिळाल्याने पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
 बोलेरो व्हॅनमध्ये चालकासोबत कर्मचारी बसतो. त्यांच्या मागे सुरक्षा रक्षकासह दुसरा कर्मचारी बसतो. बोलेरो व्हॅनच्या मागच्या बाजुला ‘स्ट्राँग रूम ’ आहे. ते तीन बाजुंनी बंद आहे. तर त्याचा दरवाजा गार्डच्या सीटजवळून उघडतो. नीलेशने दिलेल्या माहितीनुसार तो आपस्या साथीदारासह झशी राणी चौकातील एटीएममध्ये रक्कम जमा करण्यासाठी आत गेला. व्हॅनचा सुरक्षा रक्षकही त्याच्यामागे येऊन एटीएमसमोर उभा झाला. चालक अतूल मोडक व्हॅनमध्येच बसून होता. अतूलचे म्हणणे आहे की, नीलेश एटीएमध्ये जाताच एक युवक त्याच्याजवळ आला. त्याने अतुलला सर आपले पैसे खाली पडले असल्याचे सांगितले. अतुलने खाली वाकून पाहिले तेव्हा खाली दहा-दहा रुपयाचे नोट पडले होते. अतूलचे म्हणणे आहे की, तो नोट उचलू लागला. त्याने
दहा-दहा रुपयाचे पाच नोट उचलले. रुपये उचलल्यानंतर तो नीलेश व त्याचा सहकाºयाला पाहण्यासाठी एटीएमजवळ गेला. तेव्हा ते परत येत असल्याचे पाहून तो पुन्हा व्हॅनमध्ये बसला आणि गाडीसह सर्वजन बुटीबोरीला निघून गेले.
बुटीबोरी पोहोचल्यावर चोरी झाल्याचे उघडकीस आले.  या घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळेला झाशी राणी चौकात खूप वर्दळ असते. चोरी गेलेली लोखंडी पेटी काढण्यासाठी व्हॅनचा दरवाजा उघडण्याची गरज आहे. त्यासाठी आरोपीला व्हॅनमध्ये जावे लागले असेल. व्हॅनमधील स्ट्राँग रुमचा दरवाजा उघडण्यापासून तर लोखंडी पेटी बाहेर काढून फरार होतपर्यंत कुणाचीच नजर चोरांवर कशी पडली नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. व्हॅन चालक एका
युवकाने फसवल्याचे सांगत आहे. चोरीचा हा प्रकार दक्षिण भारतीय गँग वापरत असते.
 ते सामान्य नागरिकांना लक्ष्य बनवतात. पहिल्यांदाच त्यांनी कॅश व्हॅनमधून रोख रक्कम लंपास केली आहे. कॅश व्हॅनमध्ये नेहमीच कोट्यवधी रुपये असतात. यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी बंदुकधारी सुरक्षा गार्ड आणि प्रशिक्षित लोकांनाच तैनात केले जाते. त्यांच्याकडून चूक होण्याची नसते. परंतु ताज्या घटनेवरून कॅश व्हॅनची सुरक्षा सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे दिसून येते. धंतोली ठाण्याच्या नीरीक्षक सीमा मेहंदळे यांनी सांगितल्यानुसार प्रत्येक बाजुंनी तपास केला जात आहे.
 
पोलिसांचे अपयश-
ही चोरी जर दक्षिण भारतीय गँगने केली असेल तर यात पोलिसांचे अपयश स्पष्टपणे दिसून येते. शहरात दक्षिण भारतीय गँग सक्रिय असल्याचे लोकमतने अनेकदा उघडकीस आणले आहे. वेळोवेळी दक्षिण भारतीय टोळी नागरिकांची फसवणूक
करून कारमधून रोख रक्कम लंपास करीत असते. परंतु या घटनांची माहिती पोलिसांनी उघडकीस आणलेली नाही. अशातच झांशी राणी चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडत असतांना पोलिसांच्या बीट सिस्टमचे पितळ उघडे
पडल्याचे दिसून येते.
 
सीसीटीव्ही कॅमे-यात अडकले चोर-
 लुटीची ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. धंतोलीचे एपीआय रवि राजुलवार आणि गड्डीमे यांनी बुधवारी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेºयाची पाहणी केली. यात एक युवक लोखंडी पेटी घेऊन पळतांना दिसून येत आहे. काही
दूर अंतरावर जाऊन तो आपल्या साथीदारासह फरार झाल्याचा संशय आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. दुसरे सीसीटीव्ही फफुडेजही तपासले जात आहेत. तसेच कर्मचाºयांचीही विचारपूस केली जात आहे.