शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महाराजबाग वाचविण्याचे प्रकरण हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 21:45 IST

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे. आता प्राणिसंग्रहालयाला वाचविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आठ दिवसांपूर्वी महाराजबाग प्रशासनाला नोटीस मिळाली आहे. अधिकारी दोन दिवसांपासून न्यायालयात उत्तर दाखल करण्याची तयारी करीत आहेत.

ठळक मुद्देआठ दिवसांपूर्वी प्राणिसंग्रहालय प्रशासनाला नोटीस : अधिकाऱ्यांची उत्तर देण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे. आता प्राणिसंग्रहालयाला वाचविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आठ दिवसांपूर्वी महाराजबाग प्रशासनाला नोटीस मिळाली आहे. अधिकारी दोन दिवसांपासून न्यायालयात उत्तर दाखल करण्याची तयारी करीत आहेत.प्राप्त माहितीनुसार, जनहित याचिकेत महाराजबाग व्यवस्थापनाने प्राणिसंग्रहालयाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळेच प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. महाराजबाग व्यवस्थापनाचे प्रतिनिधी बुधवार, २० फेब्रुवारीला वकिलांसह न्यायालयात हजर होणार आहेत. तर दुसरीकडे व्यवस्थापनाने २ जानेवारीला सीझेडए कार्यालयाकडे (नवी दिल्ली) मान्यतेसाठी अपील केले आहे. पण आतापर्यंत सीझेडएकडून सुनावणीला येण्यासाठी कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत. सोमवार, ३ डिसेंबर २०१९ ला महाराजबागचे संचालन करणाऱ्या कृषी विद्यापीठाला प्राधिकरणाने (सीझेडए) नियमांचे पालन न करण्याचे कारण देऊन मान्यता रद्द करण्याचा आदेश जारी केला होता. त्यामुळे भोसलेकालीन १२५ वर्षे जुनी महाराजबाग बंद होण्याचे संकट येणार आहे.या संदर्भात महाराजबागच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीझेडएच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयाच्या विकास कार्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ मंजुरीसाठी वर्ष २०११ ला दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर काही सुधारणांसह सीझेडएकडे अनेकदा प्लॅन पाठविल्यानंतरही वर्ष २०११, २०१२ आणि २०१४ मध्ये काही सुधारणांच्या निर्देशांसह महाराजबाग व्यवस्थापनाकडे परत पाठविण्यात आला होता.‘मास्टर प्लॅन’ला मंजुरी केव्हा?‘मास्टर प्लॅन’ वर्ष २०१६ मध्ये सुधारणांसह सीझेडएकडे पाठविण्यात आला. पण अजूनही मंजुरी मिळालेली नाही. याच कारणांमुळे विकास कार्य सुरू होऊ शकले नाही. अखेर फेब्रुवारी २०१८ मध्ये प्राणिसंग्रहालयाचा ले-आऊट प्लॅन मंजुरीसाठी देण्यात आला होता. त्यानंतर मे २०१८ मध्ये दिल्ली येथे सुनावणीदरम्यान प्राधिकरणाने प्लॅन लवकरच मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही प्राणिसंग्रहालयाचा प्लॅन सीझेडच्या निर्देशानुसार आवश्यक सुधारणांसाठी रखडला आहे.

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरHigh Courtउच्च न्यायालय