शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार वारजूरकर यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: September 22, 2016 02:55 IST

माजी आमदार अविनाश वारजूरकर यांच्याविरुद्ध साक्षीदारास धमकावल्याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

साक्षीदाराला धमकावल्याचा आरोपनागपूर : माजी आमदार अविनाश वारजूरकर यांच्याविरुद्ध साक्षीदारास धमकावल्याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कैलाश गोलेछा (३७) रा. संभवनाथ अपार्टमेंट, वर्धमाननगर असे पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. गोलेछा यांचा विटभट्टीचा व्यवसाय आहे. वारजूरकर यांच्याविरुद्ध सदर येथील एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. भंडारा येथे एका हॉटेलमध्ये वारजूरकर यांनी पिस्तुलच्या धाकावर बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. खूप उशिरा तिने ही तक्रार दाखल केली. भंडारा पोलिसांनी २७ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात गोलेछा हे साक्षीदार आहेत. तर वारजूरकर यांना न्यायालयातून जामीन मिळालेला आहे. गोलेछा यांच्या तक्रारीनुसार बलात्काराची तक्रार दाखल झाल्यापासून वारजूरकर त्यांना धमकावत आहे. वारजूरकर यांनी गोलेछाला फोनवर मध्ये पडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या घरी जाऊन फिर्यादीच्या पत्नीलाही धमकावले व आपल्या पतीला समजावण्यास सांगितले. सातत्याने धमकावले जात असल्याने अखेर गोलेछा यानी लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी धमकावणे व माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)