शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दीपक बजाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: September 27, 2015 02:20 IST

सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एसीबीचे धाडसत्र सुरूच : कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी नागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शुक्रवारपासून सुरू असलेल्या चौकशीतून बजाज यांच्या गैरव्यवहाराचे अनेक पुरावे हाती लागले आहे. त्याचमुळे डॉ. बजाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांनी लोकमतला दिली.सोसायटीच्या माध्यमातून डॉ. दीपक बजाज यांनी अनेक लोकांकडून लाचेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेतल्याची आणि मोठी मालमत्ता जमविल्याची तक्रार एसीबीला मिळाली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या पथकाने डॉ. बजाज यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात धाड टाकून झडती घेतली. शनिवारीसुद्धा ही झडती सुरूच होती. या झडतीत एसीबीच्या पथकाला १८ लाखांची रोकड, ४८८ ग्राम सोने आणि ५.८५ किलो चांदी सापडली. याशिवाय त्यांच्याकडे ९ वाहने आढळली. त्यात एक ५५ लाखांची आलिशान कारही आहे. घरातील फर्निचर तसेच अन्य संपत्तीचा हिशेब केल्यास ही मालमत्ता पावणेतीन कोटींच्या घरात असल्याचे एसीबीचे अधिकारी सांगतात. दरम्यान, बजाज यांनी गैरव्यवहाराशी संबंधित दस्तावेज सिंधू एज्युकेशन सोसायटी परिसर, जरीपटका येथील निवासस्थान प्रिन्सिपल बंगलो, महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, के.सी. बजाज मार्ग जरीपटका येथे लपवून ठेवल्याचा संशय होता. त्यामुळे शनिवारी पाच ठिकाणी एसीबीच्या वेगवेगळ्या पथकाने झडती घेतली. प्रत्येक ठिकाणच्या चौकशीचा अहवाल एसीबीचे अधीक्षक राजीव जैन वेळोवेळी घेत होते. (प्रतिनिधी)अनेक तक्रारकर्ते पुढेडॉ. बजाज यांच्या गैरव्यवहारात सोसायटीच्या काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा एसीबीला संशय आहे. त्याचमुळे एका लिपीकाकडेही झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईचा बोभाटा झाल्यामुळे अनेक तक्रारकर्ते पुढे आल्याचे अधीक्षक जैन यांनी सांगितले. नोकरीच्या नावाखाली आमच्याकडून मोठी रक्कम घेतल्याची तक्रार करणारेही काही जण शनिवारी पुढे आल्याचे जैन यांनी सांगितले.