शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात आनंदोत्सव

By admin | Updated: May 30, 2016 02:40 IST

गुन्हेगारांना चिडणे, रागावणे आणि जोरजोरात बोलणे अन् कधी मारहाण तसेच रडारड हा पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीचा एक भाग.

वाढदिवस अन् लग्नाचा वाढदिवस : केक भरवला, पुष्पगुच्छही दिले नागपूर : गुन्हेगारांना चिडणे, रागावणे आणि जोरजोरात बोलणे अन् कधी मारहाण तसेच रडारड हा पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीचा एक भाग. त्यामुळे बहुतांश पोलीस ठाण्यात नेहमीच रुक्ष अन् धाकधुकीचे वातावरण असते. तेथे जणू आनंदोत्सवाला स्थान नाहीच, असा सर्वसामान्यांचा(गैर)समज! मात्र सोनेगावचे ठाणेदार अशोक बागुल यांनी आज पोलीस ठाण्यात एक नव्हे, दोन नव्हे, तीन-तीन आनंदोत्सव एकाचवेळी साजरे केले. अनुकरणीय तेवढाच प्रशंसनीय अशा या छोटेखानी आनंदोत्सवाने सोनेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर सुखद वातावरण अनुभवले. एरवी पोलीस कर्मचारी, गुन्हेगार, संशयित, तक्रारकर्ते त्यांच्याशी संबंधित वकील आणि फार तर एखादवेळी पत्रकार मंडळी पोलीस ठाण्यात आढळतात. तेच चिडणे, रागावणे आणि तीच मारहाण, तोच रडापडीचा अन् तक्रारीचा सूर. तेथील वातावरणाचा अनुभव आल्यामुळे म्हणा की ऐकल्यामुळे म्हणा पोलीस ठाण्यात सर्वसामान्य माणूसच काय, पोलिसांचे नातेवाईकही जायचे टाळतात. मात्र रविवारी सकाळपासूनच सोनेगाव पोलीस ठाण्यातील वातावरण उत्साहपूर्ण होते. ठाण्यात कार्यरत असलेल्या अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मुलामुलींसह येथे हसतमुखाने हजर होते. प्रसंग होता, महिला कर्मचाऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचा आणि हवालदार तसेच सहायक निरीक्षकांच्या वाढदिवसाचा! ठाणेदार बागुल यांनी हे तीनही वाढदिवस एकत्रितपणे साजरे करण्यासाठी एका छोटेखानी मात्र गोड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे वनिता जुनघरे, हवालदार संजय बांबोटे आणि सहायक निरीक्षक नितीन पगार या तिघांचेही कुटुंबीय कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्यात एकत्र झाले होते. कार्यक्रमाच्या आयोजनामागची संकल्पना ठाणेदार बागुल यांनी स्पष्ट केली आणि सहकाऱ्यांना शुभेच्छा देत तणावमुक्त कार्य करण्याचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)सुटीही दिलीआजचा दिवस या तीनही अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत घालवता यावा म्हणून त्यांना सुटी देण्यात आली. या तिघांव्यतिरिक्त अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही या कार्यक्रमाने एक सुखद अनुभूती दिली. दडपण आणि धकाधकीचे जीवन जगणाऱ्या पोलिसांसाठी असे उपक्रम सर्वत्र व्हावेत, अशी भावना अनेक पोलिसांनी व्यक्त केली.