शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडी रुळावरून घसरली

By admin | Updated: March 1, 2017 02:40 IST

अजनी यार्डातून निघालेली मालगाडी अचानक रुळावरून घसरली. ही घटना आज मंगळवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली.

नागपूर : अजनी यार्डातून निघालेली मालगाडी अचानक रुळावरून घसरली. ही घटना आज मंगळवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली. मालगाडी मेनलाईनवर येण्याआधीच हा अपघात घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्रनगरातील कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया(कॉनकोर)चा इनलँड कंटेनर सोमवारी रात्री अजनी यार्डात पोहोचला. आज दुपारी हा कंटेनर अजनी यार्डातून निघून मेनलाईनवर येत असताना नरेंद्रनगरजवळ वॅगन क्रमांक २७ चे दोन चाक रुळावरून घसरले. गाडी मेनलाईनवर नसल्याने वाहतूक अवरुद्ध झाली नाही. दोन तासांच्या परिश्रमानंतर गाडी पुन्हा रुळावर आली. दरम्यान, अजनी यार्डातील चार युनिट परत करावे लागले. हा अपघात जर मेनलाईनवर घडला असता तर दिल्ली-मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता होती.(प्रतिनिधी) सुरक्षेवर प्रश्नचिन्ह गाडीच्या रुळावरून घसरण्याच्या घटना वाढत आहेत. आता तर मालगाडीचे चाक यार्डातच घसरले. यावरून असे जाणवते की, रेल्वे बोगींच्या देखरेखीत निष्काळजीपणा केला जात आहे. ही घटना मेनलाईनवर घडली असती तर वाहतूक प्रभावित झाली असती. या घटनेत चालकाला दोषी धरले जात आहे. पण घटना गाडी मेनलाईनवर येण्याआधी घडली, हे मात्र सोयीस्करपणे लपवले जात आहे.