शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील शासकीय बालगृहातील मुलांना केअरटेकरकडून अमानुष मारहाण

By योगेश पांडे | Updated: June 6, 2025 23:09 IST

२ जून रोजी त्यांचे पालक त्यांना घेऊन जाण्यासाठी उपस्थित झाले. नियमानुसार मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.

योगेश पांडे नागपूर : शासकीय बालगृहात ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना तेथील केअरटेकरसह तीन कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या बालकांना इतके मारण्यात आले की त्यांच्या पाठीवर वळदेखील उमटले. मारहाण झालेल्या बालकांना धमकीदेखील देण्यात आली. तीनपैकी दोन आरोपी आऊटसोर्सिंस एजन्सीचे कर्मचारी आहेत. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

शासकीय बालगृहातील कनिष्ठ काळजीवाहक राजेंद्र रामाजी वासनिक, तसेच पुणे येथील स्मार्ट सर्व्हिस प्रा.लि. या कंपनीचे इंजमामअली शहाअली सय्यद, सोहेल राज पठाण अशी आरोपींची नावे आहेत. पाटणकर चौकात शासकीय मुलांचे बालगृह आहे. धनंजय करंबे यांच्याकडे तेथील अतिरिक्त प्रभार आहे. ज्या मुलांना संरक्षणाची आवश्यकता आहे तसेच पोलिसांना सापडलेली बालके तेथे ठेवण्यात येतात. त्यांची काळजी घेण्यासाठी काळजीवाहक नियुक्त करण्यात आले आहेत. ३० मे रोजी सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने १४ ते १६ वयोगटातील सहा मुलांना कायदेशीर प्रक्रिया करून बालगृहात दाखल केले.

२ जून रोजी त्यांचे पालक त्यांना घेऊन जाण्यासाठी उपस्थित झाले. नियमानुसार मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी दोन मुलांनी त्यांना तीनही आरोपींनी बेदम मारहाण केल्याची माहिती दिली. आरोपींनी त्यांना पोलिसांत खोटा गुन्हा दाखल करण्याचीदेखील धमकी दिली. एका मुलाच्या उजव्या मांडीवर तसेच एकाच्या पाठीवर मारल्याचे वळ होते. आरोपींनी त्यांना काठीने मारले होते. ही बाब समोर आल्यावर समितीने बालगृहातील अधिकाऱ्यांना पोलिसांत तक्रार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार करंबे यांच्या तक्रारीवरून तीनही आरोपींविरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिघांनी इतरही मुलांना मारहाण केली होती का याचा तपास सुरू आहे.