शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कारला मालवाहूची धडक; तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST

काटोल : पत्नीला माहेरी सोडून गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या कारला मालवाहूने धडक दिली. या अपघातात प्रशीस हरिचंद्र उभाळे (२८, रा. ...

काटोल : पत्नीला माहेरी सोडून गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या कारला मालवाहूने धडक दिली. या अपघातात प्रशीस हरिचंद्र उभाळे (२८, रा. वरूड, जि.अमरावती) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पारडसिंगा गावासमोरील पुलाजवळ रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

काही महिन्याआधीच प्रशीसचा विवाह नागपूर येथील तरुणीशी झाला होता. घटनेच्या आदल्या दिवशी शनिवारी प्रशीसने पत्नीला मारोती कारने (एमएच २७ एसी ९०८८) तिच्या माहेरी नागपूर येथे सोडून दिले. रविवारी सकाळी तो नागपूर येथून वरूडला घरी परतताना पारडसिंगा गावासमोरील पुलाजवळ पोहोचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो मालवाहूने (क्र. एमएच २६ व्ही ४४५२) त्याच्या कारला जबर धडक दिली. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात प्रशीस गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काटोल पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. घटनेची माहिती प्रशीसच्या कुटुंबीयांना देण्यात आली. याप्रकरणी हरिचंद्र सूर्यभान उभाळे यांच्या तक्रारीवरून मालवाहू चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला.

संसार ठरला औटघटकेचा

प्रशीसचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. पती-पत्नीने सुखी आयुष्याची स्वप्ने बघितली होती. मात्र त्यांची ही स्वप्ने पूर्ण होण्याआधीच काळाने घाला घातल्याने त्यांचा संसार औटघटकेचा ठरला. ज्या घरात लग्नामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते तिथे प्रशीसच्या मृत्यूच्या बातमीने शोककळा पसरली.