शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका दुचाकीचालकाला जोरदार धडक मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका दुचाकीचालकाला जोरदार धडक मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. रविवारी सकाळी १० च्या सुमारास सुरेंद्रनगर आरपीटीएस रोडवर हा अपघात घडला. सचिन पारधी (वय ३१, रा. न्यू काछीपुरा) असे जखमीचे नाव असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

सचिन त्याच्या दुचाकीने जात असताना सुसाट वेगाने आलेला कारचालक हर्षवर्धन रत्नपारखी याने त्याला जोरदार धडक मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात घडल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. त्यातील बघ्यांनी कारचालक रत्नपारखीवर दबाव निर्माण केल्यानंतर, तो जखमी सचिनला घेऊन एका खासगी इस्पितळात दाखल झाला. दरम्यान, या अपघाताची माहिती कळताच बजाजनगर पोलीस पोहचले. त्याचप्रमाणे सचिनच्या वस्तीतील मंडळी आणि रत्नपारखीचेही मित्र रुग्णालयात पोहचले. सचिनची प्रकृती गंभीर असल्याचे कळाल्यानंतर वातावरण संतप्त झाले. ते बघून बजाजनगर पोलिसांनी दोन्हीकडच्या मंडळींना बजाजनगर ठाण्यात नेले. तेथे भलतीसलती चर्चा सुरू झाल्याने वातावरण पुन्हा तापले. सेटलमेंटची चर्चा सुरू होताच जखमी सचिनच्या हितचिंतकांनी सरळ वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर बजाजनगर पोलिसांनी कारचालक आरोपी रत्नपारखीची चाैकशी सुरू केली. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी कारचालकाकडे परवाना नव्हता. तरीसुद्धा तो हवेत कार चालविल्यासारखा चालवत होता. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात पोलिसांकडून चाैकशी सुरू होती.

----