शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कार उलटली, पोलिसाचा मृत्यू

By admin | Updated: July 11, 2017 01:47 IST

शेगाव येथून दर्शन घेऊन परत येणाऱ्या पोलीस दलातील मित्रांच्या कारला अपघात होऊन एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला.

धामणाजवळ अपघात : पाच जण जखमीलोकमत न्यूज नेटवर्कधामणा : शेगाव येथून दर्शन घेऊन परत येणाऱ्या पोलीस दलातील मित्रांच्या कारला अपघात होऊन एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. हा अपघात हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणा शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास झाला. या अपघातात दोन पोलिसांसह आणखी तीन असे पाच जण जखमी झाले. मनीष विश्वनाथ कडवे (२९, रा. सिरसपेठ, नागपूर) असे मृताचे नाव असून, ते सोनेगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. पोलीस शिपाई रोशन शंकराव निंबर्ते (३०, रा. सोमवारी क्वॉर्टर, नागपूर-नेमणूक नंदनवन पोलीस स्टेशन), पंकज संपतराव मसराम (२८, रघुजीनगर, नागपूर-नेमणूक कोतवाली पोलीस स्टेशन) यांच्यासह कारचालक सूरज पराते (२८, रा. नागपूर) शुभम नरेंद्र हरडे (२४, रा. न्यू नंदनवन ले-आऊट, नागपूर) तसेच एकाचा जखमींमध्ये समावेश आहे. नागपुरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पाचही पोलीस मित्र शेगाव येथे एमएच-३१/डीके-५२०० क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने गेले होते. दर्शन घेऊन तेथून परत येत असताना मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. त्यात मनीष कडवे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कारमध्ये बसलेले अन्य पाच जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांच्या मदतीने जखमींना खासगी रुग्णालयात हलविले. याबाबत हिंगणा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८ सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक तिवारी, हेड कॉन्स्टेबल राजू भुक्ते, सोमेश्वर वर्धे करीत आहेत. राज्यस्तरीय धावपटू मनीष हा राज्यस्तरीय धावपटू होता. आंतरराष्ट्रीय धावपटू रोहिणी आणि मोनिका राऊत या मनीषच्या घराशेजारीच राहतात. त्यांनी सोबतच सराव करण्यास सुरुवात केली होती. प्रशिक्षक एस. जे. अ‍ॅन्थोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषने अनेक राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या आहेत. आई-वडिलांना अर्धांगवायूमनीषच्या परिवारात वडील विश्वनाथ आई बेबी व लहान भाऊ निखिल आहे. आई गेल्या पंधरा वर्षांपासून अर्धांगवायूमुळे खाटेवर आहे. तर वडिलांनाही तीन वर्षांपूर्वी संधीवाताचा आजार जडल्याने तेसुद्धा खाटेवरच आहे. त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मनीष व निखिल यांच्याकडे होती. घरातील कामाचा ताण वाढल्याने मनीषच्या लग्नाचा विचार सुरू होता. त्यासंबंधाने आप्तस्वकीयांमध्ये बोलचालही सुरू होती. सुदृढ शरीरयष्टीचा मनीष २००८ मध्ये पोलीस विभागात रुजू झाला होता. पोलीस मुख्यालयानंतर महाल येथील संघ मुख्यालयात त्याने दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून तो सोनेगाव ठाण्यात होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेमध्ये कार्यरत असलेल्या मनीषचा स्वभाव मनमिळावू आणि सेवाभावी असल्यामुळे त्याची केवळ पोलीस विभागच नव्हे तर अन्य विभागात तसेच सामाजिक क्षेत्रातही मोठी ओळख होती. गुन्हेगारी वर्तुळातील अनेक गुन्हेगारांच्या हालचालीवर त्याची नजर होती. त्यामुळे अवैध धंदेवाले, गुन्हेगार मनीषला वचकून राहायचे. त्याच्या अपघाती मृत्यूच्या वृत्ताने पोलीस विभागासह मित्रपरिवारावरही तीव्र शोककळा पसरली. सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. परिवारातील कर्ता माणूस असलेला मनीष गेल्याने कडवे कुटुंबावर दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे.