शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विधानभवनाजवळ विकत होते गांजा : कुख्यात वसीम बब्बरसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 23:57 IST

Drug paddlers, Crime News सिव्हिल लाईन्समध्ये विधानभवन आणि वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या कुख्यात वसीम ऊर्फ बब्बर पठाण आणि त्याचा साथीदार सोमलाल विश्वकर्माला एनडीपीएस सेलने रंगेहात पकडले.

ठळक मुद्देएनडीपीएस सेलची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिव्हिल लाईन्समध्ये विधानभवन आणि वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या कुख्यात वसीम ऊर्फ बब्बर पठाण आणि त्याचा साथीदार सोमलाल विश्वकर्माला एनडीपीएस सेलने रंगेहात पकडले.दोन्ही आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अनेक दिवसानंतर वसीम पोलिसांच्या हाती लागला आहे. वसीम अनेक वर्षांपासून गांजाची तस्करी करीत आहे. सिव्हिल लाईन्समध्ये विधानभवनाजवळ मीठा नीम दरगाह आहे. काहीच अंतरावर वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय आहे. दोन्हीमध्ये एक छोटी झोपडपट्टी आहे. आरोपी याच झोपडपट्टीत राहतात. ते मीठा नीम दरगाहच्या समोर उभे राहून गांजाची विक्री करतात. गांजा खरेदी करणाऱ्यांची या परिसरात नेहमीच ये-जा असते. वसीम कुख्यात गुन्हेगार असल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. एनडीपीएस सेलचे पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. आज सकाळी त्याने सोमलाल विश्वकर्माच्या मदतीने गांजाची विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता अ‍ॅक्टिव्हा गाडीत ५० हजार रुपये किमतीचा ३ किलो ३६२ गॅ्रम गांजा आढळला. पोलिसांनी गांजा आणि अ‍ॅक्टिव्हा जप्त केली आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करी