शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार ठरले, रणनीती ठरली, आता लढाईच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केल्याने जिल्ह्याचा शांत झालेला राजकीय माहोल पुन्हा गरम होणार आहे. ...

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केल्याने जिल्ह्याचा शांत झालेला राजकीय माहोल पुन्हा गरम होणार आहे. राजकीय पक्षाचे उमेदवार लढण्यास तयार आहेत. रणनीतीही निश्चित आहे. आता फक्त संघर्ष बाकी आहे. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. कोरोनाच्या काळात येत्या २२ दिवसात उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचायचे आहे.

दरम्यान, काही उमेदवारांनी दोन महिन्याच्या मिळालेल्या कालावधीचा सदुपयोग केला आहे. त्यांनी आपला जनसंपर्क सर्कलमध्ये चांगला वाढविला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातील १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. नियमानुसार तीन महिन्याच्या आत निवडणुका घ्यायच्या असल्याने निवडणूक आयोगाने जून २०२१ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. उमेदवारी अर्जाची छाननीदेखील झाली होती. फक्त वैध उमेदवाराची यादी निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध व्हायची होती. पण कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली. सोमवारी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आता पुन्हा राजकीय वातावरण रंगणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ९ जुलैपर्यंत झालेली प्रक्रिया कायम ठेवण्यात आली आहे. आता २१ सप्टेंबर रोजी निवडणूक विभाग वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या १६ सदस्यांमध्ये ७ जागा काँग्रेसच्या आहेत. चार राष्ट्रवादी, चार काँग्रेस व एक शेकापची जागा आहे. काँग्रेसने एक जागा वगळता सदस्यत्व रद्द झालेल्या उमेदवाराला अथवा त्यांच्या कुटुंबीयालाच उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीनेही उमेदवारी देताना केवळ एक बदल केला आहे. भाजपाने सदस्यत्व रद्द झालेल्या चारही उमेदवाराला पुन्हा उमेदवारी दिली आहे. पण गुमथळा सर्कलमध्ये झालेल्या बंडखोरीने भाजपाचे कमळ चिन्ह गोठविण्यात आले आहे.

- बंडखोरीची लागण, शिवसेनेची डोकेदुखी

गुमथळा, येनवा, सावरगाव, गोधनी, राजोला या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे, तर शिवसेनेने १६ जागांपैकी १२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. जिल्हा परिषदेत झालेल्या आघाडीत शिवसेना केवळ नावाचीच आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना आपले अस्तित्व वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्याच उमेदवारांची डोकेदुखी वाढविणार आहे.

- जिल्हा परिषदेसाठी १०३ व पंचायत समितीसाठी १६० उमेदवारांचे अर्ज

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी जून महिन्यात जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषदेसाठी १०३ व पंचायत समितीसाठी १६० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. ६,१६,०१६ मतदार या पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.