शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, मुंबईपूर्वी नागपुरात ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’

By admin | Updated: February 7, 2017 02:04 IST

सामाजिक न्याय विभागाच्या निधीमधून नागपुरातील मेडिकल येथे साकारण्यात येणाऱ्या ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’वर सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.

१२० कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटपुढे : ‘एससी’, ‘एसटी’ना विशेष सवलत देण्याच्या सूचनानागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या निधीमधून नागपुरातील मेडिकल येथे साकारण्यात येणाऱ्या ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’वर सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. यात १२० कोटींच्या निधीचा प्रस्ताव तत्काळ ‘कॅबिनेट’पुढे सादर करा, अशा सूचना देण्यात आल्या. यामुळे येत्या मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, पुणे, मुंबई व औरंगाबाद येथे होऊ घातलेल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट पूर्वी नागपुरात हे इन्स्टिट्यूट रुग्ण सेवेत असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुख्य उपस्थितीत झाली. या बैठकीत ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’साठी नागपूर मेडिकलने उपलब्ध करून दिलेली चार एकरची जागा, पहिल्या टप्प्यात तळमजल्यावर रेडिओथेरपी विभाग, दुसऱ्या टप्प्यात पहिल्या मजल्यावर सर्जरी आॅन्कोलॉजी तर तिसऱ्या टप्प्यात दुसऱ्या मजल्यावरील मेडिकल आॅन्कोलॉजी विभागावर चर्चा करण्यात आली. बैठकीत टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. शर्मा उपस्थित होते. त्यांनी नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट आवश्यक असल्याचे मत मांडून उपचारासाठी आवश्यक असलेले दोन ‘लिनीयर एक्सीलेटर’ ‘कोबाल्ट’, ‘ब्रॅकीथेरपी’ व ‘सीटी सेम्युलेटर’ उपकरणांच्या खरेदीत मदत करण्याचे आश्वासनही दिले. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीन शिनगारे, सहायक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, मेडिकलच्या कॅन्सर विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे व डॉ. विरल कामदार उपस्थित होते.(प्रतिनिधी)पुणे, मुंबईमध्ये ‘पीपीपी’स्तरावर इन्स्टिट्यूटसूत्रानुसार, या बैठकीत सार्वजनिक व खासगी भागीदारीतून (पीपीपी) पुणे व मुंबईमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट करण्यावरही चर्चा करण्यात आली. राज्याच्या १२० कोटींमधून औरंगाबादमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटची घोषणा याआधीच करण्यात आली आहे. परंतु त्यापूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या १२० निधीतून नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कामाला सुरुवात होईल, याची शक्यताही या बैठकीत वर्तविण्यात आली. राजकुमार बडोले यांनी केल्या विशेष सूचनासामाजिक न्याय विभागाच्या १२० कोटीमधून हे इन्स्टिट्यूट होणार आहे. यामुळे अनुसूचित जाती (एसटी) व अनुसूचित जमातीतील (एससी) रुग्णांना या इन्स्टिट्यूटमध्ये विशेष सोई सवलती उपलब्ध करून देण्यात याव्या, अशा सूचना सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी केल्याचे, सूत्राने सांगितले.