शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बुटीबोरीमध्ये कॅन्सर तपासणी व रोगनिदान शिबिर आज

By admin | Updated: March 17, 2015 01:41 IST

लोकमत सखी मंचच्या संस्थापिकाज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नि:शुल्क कॅन्सर रोग तपासणी,

ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत सखी मंचचे आयोजन नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापिकाज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नि:शुल्क कॅन्सर रोग तपासणी, रोगनिदान व जनजागृती व्याख्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर आज मंगळवारी सकाळी १० वाजता जैन सहेली मंडळाच्या श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट सेंटर, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी, बुटीबोरी येथे होईल.शिबिराचे आयोजन लोकमत सखी मंच, कॅन्सर रिलीफ सोसायटीद्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ‘कॅन्सर होऊ शकतो कॅन्सल’ या नावाखाली आयोजित शिबिरात महिलांची सामान्य आरोग्य तपासणीसोबतच ‘स्तनाचा कॅन्सर’ व ‘गर्भाशयाचा कॅन्सर’ची तपासणी करण्यात येईल. शिबिरात प्रथम येऊन नोंदणी करणाऱ्या ५०० महिलांची तपासणी केली जाणार आहे.या शिबिरात सेंट्रल इंडिया कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचे कॅन्सर रोगतज्ज्ञ डॉ. अजय मेहता आणि डॉ. सुचित्रा मेहता महिलांची तपासणी करतील. तपासणी पूर्वी हे दोन्ही तज्ज्ञ कर्करोग कसा ओळखावा, त्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्या, कर्करोग कुणालीही होऊ शकतो, त्या आजाराची संभाव्य लक्षणे, त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.या शिबिरात तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलची चमू तपासणी करेल. डॉ. ललित गांधी यांच्या सहकार्याने कोल्हापूर येथून विशेष तपासणी वाहन येणार आहे. यात कॅन्सरचे लक्षणे आढळून येणाऱ्या महिलांची अ‍ॅडव्हान्स चाचणी करण्यात येईल. स्व. ज्योत्स्ना दर्डा या लोकमत सखी मंचसोबतच जैन सहेली मंडळाच्याही संस्थापिका आहेत. त्यांनी आयुष्यभर सेवाभावी कार्य केले. त्यामुळे लोकमत सखी मंचच्यावतीने वर्षभर अनेक सेवाभावी कार्य केले जातात. या शिबिराला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेन्द्र सवाई आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. महिलांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत सखी मंचने केले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी हेमलता देशमुख ८८०५५२८६१७, नीलिमा धामंडे ९८८१७५८७७५, लोकमत सखी मंच कार्यालय लोकमत भवन रामदासपेठ ९९२२२०००६३ किंवा २८२९३५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.