लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण विभागाने शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात २३ आॅक्टोबरला शासन निर्णय काढला. या निर्णयात शिक्षक समुदायाला अपमान करणाºया अटी टाकण्यात आल्या आहे. या अटीमुळे वरिष्ठ व निवड श्रेणीत पात्र ठरणाºया शिक्षकांना वंचित राहावे लागणार असल्याने भाजपा प्रणीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नागपूर विभागातर्फे हा जीआर रद्द करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. शिक्षकांच्या मते अट क्रमांक ४ ही प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रगत शाळा व शाळा सिद्धीप्रमाणे ‘ए’ ग्रेडमध्ये येणे आवश्यक आहे. तसेच माध्यमिक शिक्षकांच्या वर्गाचा इयत्ता ९ व १० चा निकाल ८० टक्के लागणे आवश्यक आहे.शासन निर्णयातील ही अट खासगी शाळेतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील अनुसूची ‘क’ चा उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे हा शासन निर्णय ताबडतोब रद्द क रावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात विभागाचे अध्यक्ष के. के. बाजपेयी, विभाग कार्यवाह योगेश बन, रंजना कावळे, अजय भोयर, राजेंद्र पटले, सुधीर अनवाने, रामदास गिरडकर, सुधीर पाटील, विमल मिश्रा, गणेश चिखले, ओमप्रकाश नाल्हे आदी सहभागी झाले होते.
वरिष्ठ व निवड श्रेणीचा जीआर रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:48 IST
शिक्षण विभागाने शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात २३ आॅक्टोबरला शासन निर्णय काढला. या निर्णयात शिक्षक समुदायाला अपमान करणाºया अटी टाकण्यात आल्या आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणीचा जीआर रद्द करा
ठळक मुद्देभाजपप्रणित शिक्षक संघटनेची निदर्शने