शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची विशेष सभा रद्द ; सत्तापक्षाचे डावपेच नापास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:37 IST

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१९-२० या वर्षाचा सुधारित व २०२०-२१ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प अद्याप सादर न केल्याने नाराज झालेल्या सत्तापक्षाने महापालिकेची विशेष सभा १२ मार्चला बोलवली होती. परंतु बुधवारी प्रशासनाने ही सभा रद्द झाल्याचे पत्र जारी केले.

ठळक मुद्देअर्थसंकल्पावरून आयुक्तांना घेरण्याची संधी सोडली : २० मार्चला सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१९-२० या वर्षाचा सुधारित व २०२०-२१ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प अद्याप सादर न केल्याने नाराज झालेल्या सत्तापक्षाने महापालिकेची विशेष सभा १२ मार्चला बोलवली होती. परंतु बुधवारी प्रशासनाने ही सभा रद्द झाल्याचे पत्र जारी केले. विशेष सभा बोलावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी अर्थसंकल्पासाठी वेळ मागितल्याने सत्तापक्षाचे डावपेच नापास ठरले. या घडामोडीमुळे सत्तापक्षाला माघार घ्यावी लागल्याची चर्चा आहे.४ मार्चला स्थायी समिती सदस्यांनी महापौर संदीप जोशी यांच्याकडे मागणी केल्यानुसार १२ मार्चला विशेष सभा बोलवाण्याची नोटीस काढण्यात आली. त्यानंतर ५ मार्चला आयुक्तांनी स्थायी समिती अध्यक्षांना पत्र लिहून महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ९५ अंतर्गत मनपाचा २०१९-२० या वर्षाचा सुधारित व २०२०-२१ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वेळ मागितली. आयुक्तांनी ११ किंवा १२ मार्चला वेळ मागितली होती. आयुक्तांनी पत्र दिल्यानंतर विशेष सभेचे औचित्य उरले नव्हते. सभागृहात आयुक्तांकडून हेच सांगितले जाणार होते की, अर्थसंकल्पासाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावरून आयुक्तांना कोंडीत पकडण्याचे सत्तापक्षाचे डावपेच फेल ठरले आहेत. आयुक्त अर्थसंकल्प कधी सादर करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी आयुक्तांना अर्थसंकल्प सादर करण्यासाठी व्यवस्थित पत्र द्यावे, असे कळविले आहे. ११ तारीख गेली व १२ ची सभा रद्द झाली. त्यामुळे १६ तारखेला स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.आयुक्तांनी वेळ मागितल्याने सभा रद्दसत्तापक्ष नेता संदीप जाधव म्हणाले, विशेष सभेपूर्वी आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वेळ मागितली आहे. अशा परिस्थितीत सभागृहातही त्यांनी हीच माहिती दिली असती. मी तर वेळ मागितली आहे. परंतु दिली नाही अशी भूमिका मांडली असती. त्यामुळे विशेष सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आयुक्त अर्थसंकल्प कधी सादर करणार याबाबत माहिती नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाbudget 2020बजेट