शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' शिक्षण मंडळाच्या शाळांची मान्यता रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 10:38 IST

महाराष्ट्रातील विविध शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येईल व त्यासाठी कायद्यात संशोधन करून अधिक कठोर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.

ठळक मुद्देमराठी सक्तीच्या घोषणेचे स्वागतपण कठोर अंमलबजावणीचा आग्रह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील विविध शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येईल व त्यासाठी कायद्यात संशोधन करून अधिक कठोर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत असले तरी कठोर अंमलबजावणीसाठी शासन काय पावले उचलणार, कोणत्या वर्गापर्यंत ही सक्ती लागू असेल, याबाबत कोणतीही स्पष्टता दिसून येत नसल्याने साशंकताही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे २००९ मध्ये तत्कालीन शासनानेही अशाप्रकारे आठवीपर्यंत मराठी सक्तीचे परिपत्रक काढले होते, मात्र अंमलबजावणीअभावी त्याचा फज्जा उडाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केवळ घोषणा ठरू नये, असा आग्रह तज्ज्ञांनी धरला.

मुख्यमंत्री धाडस दाखविणार का?राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करावे यासाठी राज्य शासनाने २००९ सालीच निर्णय जारी करून सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य मंडळाच्या शाळांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र देताना मराठी भाषा द्वितीय शिकविणे सक्तीचे केले होते. मात्र याची कठोरपणे अंमलबजावणी झाली नाही. ही अंमलबजावणी का झाली नाही? ज्यांनी केली नाही त्यांची चौकशी होणार का? त्यांच्या विरोधात काय कारवाई करणार? यांचीही उत्तरे मिळाली पाहिजेत. अशा नामांकित पाच/दहा शाळांची मान्यता रद्द करण्याचा दणका दिला तरच या शाळांचे व्यवस्थापन सुतासारखे सरळ होईल. त्यांची मान्यता रद्द करण्याचे धाडस मुख्यमंत्री फडणवीस दाखविणार का? त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही तर ही सक्ती पुन्हा कागदावरच राहील.- शेखर जोशी

मराठीतूनच रुजतात संस्काराची मुळेमराठी भाषा अनिवार्य करणे अगदी स्तुत्य निर्णय आहे. महाराष्ट्र राज्यात संपूर्ण कानाकोपऱ्यात मराठी भाषा विविध स्वरूपात बोलली जाते. जन्मत: मूल याच भाषेतून ज्ञान संवर्धनाचे कार्य करते. कुठलीही संकल्पना मुलांना त्यांच्या मातृभाषेतून किंवा सभोवताली बोलल्या जाणाºया भाषेत लवकर स्पष्ट होते. तसेच मराठी भाषेतून भावभावनांचे अगदी मार्मिक अध्यापन पद्धतीतून मुलांमध्ये संस्काराची मुळे रुजवायला मलाही अगदी सहज वाटली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा योग्यच आहे. मात्र या घोषणेची काटेकोर अंमलबजावणी व्हावीे.- मुबारक सय्यद, मुख्याध्यापक, जिप शाळा खराशी

मराठी माणसांनीही कर्तव्य पार पाडावीमुख्यमंत्री यांनी ह्यमराठी सक्तीची करण्याची आणि त्याबाबत कठोर कायदा करण्यात येईल ह्यअशी जी विधानसभेत ग्वाही दिली त्याचं स्वागत आहे. कारण मराठी भाषा वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी मुलांना मराठी येत नाही. नीट वाचता येत नाही, लिहिता येत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपली ओळख कायम ठेवण्यासाठी शासनाच्या निर्णयाला हातभार लावणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. मराठी बाबत कायदे करणे आणि ते अमलात आणणेही तेवढेच गरजेचे आहे.- विजया ब्राम्हणकार, लेखिका

गांभीर्य राहावेमहाराष्ट्रात राहणाºया प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, त्याने मराठी शिकलीच पाहिजे. त्यासाठी कठोर कायदे करावे लागले तरी हरकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे स्वागतच आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केवळ घोषणा राहू नये तर कठोरपणे अंमलात यावी. याकडे मुख्यमंत्री, शासन व प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलणे काळाची गरज आहे.- शुभांगी भडभडे, लेखिका

घोषणेची अंमलबजावणी करावी.केवळ घोषणाबाजीने चालणार नाही तर ठोस कृती करण्याची गरज आहे. दक्षिणकडील राज्यात अशाप्रकारे मातृभाषेची सक्ती कठोरपणे अंमलात आणण्यात आली आहे. मराठी आज केवळ खेड्यापाड्यात आणि बहुजन वर्गात शिकण्यापुरती मर्यादित झाल्यासारखी वाटते. शासन, प्रशासन व या क्षेत्रातील लोकांनी प्रामाणिकपणे या घोषणेची अंमलबजावणी करावी.- शैलेंद्र लेंडे, मराठी विभाग प्रमुख,नागपूर विद्यापीठ

स्पष्टता दिसत नाहीमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे खरोखरच स्वागत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा आॅगस्ट २००९ मध्ये शासनाने आठवीपर्यंत मराठी सक्तीची करण्याची निर्णयाला धरूनच आहे की बारावीपर्यंत सक्तीची करण्याच्या आमच्या मागणीनुसार आहे, ही बाब स्पष्ट होत नाही किंवा त्यांनी स्पष्ट केली नाही. याशिवाय २००९ च्या निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही, ती न करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार का, हेही स्पष्ट करणे गरजेचे आहे.- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी,ज्येष्ठ साहित्यिक

टॅग्स :marathiमराठी