शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

परवाना शुल्क वाढीचा अध्यादेश रद्द करा

By admin | Updated: February 28, 2016 03:01 IST

महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा करून वाहन परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ करण्यात आली आहे.

प्रकाश गजभिये : आरटीओ अधिकाऱ्यांना घेरावनागपूर : महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा करून वाहन परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आॅटो व टॅक्सी चालकांचे कंबरडे मोडणारे आहे. शासनाने हा अध्यादेश रद्द करावा, या मागणीला घेऊन आ. प्रकाश गजभिये यांनी शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास घेराव घातला. दरम्यान कार्यालयासमोर अध्यादेशाची होळीही केली.पूर्वी आॅटोरिक्षा परवान्याच्या नुतनीकरणाला २०० रुपये शुल्क आकारले जायचे आता नव्या आदेशाप्रमाणे १००० रुपये आकारले जाणार आहे. मासिक दंडाचे १०० रुपये शुल्क असताना ते ५००० रुपये दंड निर्धारीत करण्यात आले आहे. परमिट न घेणाऱ्यांना पूर्वी २०० रुपये शुल्क होते ते आता १० हजार रुपये करण्यात आले आहे. आॅटोचालकांसाठी हे शुल्क अवास्तव आहे. हा अध्यादेश त्वरित रद्द करून आॅटोचालकांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन आ. गजभिये यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना घेराव घालून दिले. तीन तास चाललेल्या या घेराव्यात आ. गजभिये यांनी लॉटरी पद्धतीने देण्यात येणाऱ्या आॅटो परवान्यासाठी मराठी भाषेच्या सक्तीवरही सडकून टीका केली. यावेळी विजय गजभिये, गोपी आंभोरे, संतोष नरवाडे, रमेश मानकर, हैदर अली शेख, उत्तररावजी मरसकोल्हे, रवी किलनाके, विजय डोरले, मनोज ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)