शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

हनीसिंगचा अटकपूर्व जामीन रद्द करा : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:23 IST

अटी व शर्तींचे उल्लंघन आणि अन्य विविध प्रकारची बेकायदेशीर कृती केल्यामुळे रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा अशा विनंतीचा अर्ज तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे.

ठळक मुद्देअटी व शर्तीचे पालन केले नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अटी व शर्तींचे उल्लंघन आणि अन्य विविध प्रकारची बेकायदेशीर कृती केल्यामुळे रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा अशा विनंतीचा अर्ज तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.हनीसिंगवर अश्लील गाणी गाण्याचा आरोप आहे. जब्बल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. आदेशातील शर्तीनुसार हनीसिंग न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही. दरम्यान, न्यायालयाने त्याला काहीवेळा देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली. त्याकरिता त्याला रहिवासी पत्ता, संपर्क पत्ता इत्यादी माहिती पोलिसांना द्यायची होती. परंतु, त्याने यासंदर्भात खोटी माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. प्रकरणाच्या तपासाकरिता हनीसिंगला पोलिसांसमक्ष हजर करणे आवश्यक आहे असे जब्बल यांचे म्हणणे आहे. जब्बलतर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू कामकाज पाहतील.

टॅग्स :Honey Singhहनी सिंहCourtन्यायालय