शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबोतच्या संबंधांवर काय म्हणाले?
3
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
4
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
5
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
6
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
7
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
8
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
9
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
10
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
12
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
13
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
14
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
15
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
16
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
17
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
18
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
19
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
20
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
Daily Top 2Weekly Top 5

सेस रद्द करा किंवा अर्ध्यावर आणावा; नवीन सरकारकडून अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:22 IST

शासनाने सेस अर्ध्यावर आणल्यास जास्तीत जास्त व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीत येतील, व्यापार वाढेल आणि शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव मिळेल, असे मत आडतियांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्दे अडतियांची पाच वर्षांपासून मागणीव्यवसाय वाढीसह भाव मिळणारराज्यात ३०७ ‘एपीएमसी’

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक देश, एक कर यानुसार केंद्र सरकारने देशात जीएसटी लागू केल्यानंतर स्थानिक कर रद्द करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्वच अडतियांनीही स्थानिक कर ‘सेस’ रद्द न करता राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आकारण्यात येणारा शेकडा १.०५ रुपये एमपीएमसी कर किंवा सेस ५५ पैशांवर आणण्याची मागणी केली होती. राज्य शासनानेही अडतियांना सेस कमी करण्याचे आश्वासन दिले होते. पूर्वीच्या सरकारने त्यावर ठोस निर्णय घेतला नाही. आता ही मागणी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लावून धरण्यात येणार आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा करून सरकारने अध्यादेश काढावा, अशी अडतियांची मागणी आहे. शासनाने सेस अर्ध्यावर आणल्यास जास्तीत जास्त व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीत येतील, व्यापार वाढेल आणि शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव मिळेल, असे मत आडतियांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

कळमना बाजार समितीला मिळतात दरवर्षी ३० कोटीकळमना धान्य बाजार अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष अतुल सेनाड यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. या क्षेत्रात विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर बाजार समिती सेस आणि इतर शुल्क वसूल करून नियमन करते. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीकडे दरवर्षी सेसच्या माध्यमातून २५ ते ३० कोटी रुपये गोळा होतात. समितीचा वार्षिक खर्च १० कोटींच्या आसपास आहे. एकंदरीत समितीला दरवर्षी नफा होतो. शासनाने सेस शेकडा १.०५ रुपयांपासून ५५ पैशांपर्यंत कमी केल्यानंतरही समितीला नफाच होणार आहे. ही मागणी बाजार समितीतील सर्वच अडतिया असोसिएशनने २०१४-१५ मध्ये फडणवीस सरकारकडे केली होती. त्यावेळी सरकारात्मक चर्चा झाली होती. पण त्यानंतर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही.

शेतकऱ्यांनाही सेस नकोसेनाड म्हणाले, शेतकऱ्यांसाठी बाजार समिती विश्वासू बाजारपेठ आहे. शासनाने सेस कमी केल्यास खरेदीदार किंवा व्यापाऱ्यांना परवडणार आहे. व्यवसाय वाढून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. केंद्र सरकारने डिजिटल सेवा केली, पण शेतकऱ्यांना त्यातील शून्य टक्केही समजत नाही. शेतकरी पिढ्यानपिढ्या संबंधित अडतियांवर विश्वास ठेवून माल विकतो आणि चुकारे घेतो. ही पद्धत आजही सुरू आहे. बाजार समितीत व्यवसाय वाढीसाठी सेस अर्ध्यावर आणणे गरजेचे आहे. सेस रद्द करण्याची शेतकऱ्यांचीही मागणी आहे.

धान्यावरील सेस रद्द करावाइतवारी धान्य बाजार असोसिएशनचे सचिव प्रताप मोेटवानी म्हणाले, बाजार समितीत धानावर सेस आकारण्यात येतो. त्यामुळे धानापासून तयार होणारे तांदूळ आणि कनकी, तसेच तुरीपासून तयार होणाऱ्या तूर डाळीवर सेस आकारू नये. दुहेरी सेस आकारणीने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. बाजार समितीबाहेर धान्य बाजारात धान्याची विक्री सेसविना करण्यात येते. सेसविना विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर समिती काहीही कारवाई करीत नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्यावर सेस आकारण्याचे औचित्य नाही. राज्य शासनाने सेस रद्द करावा. केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतरही स्थानिक बाजार समितीने सेस आकारू नये. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात धान्य व्यापारी सेस रद्द करण्याची आणि अध्यादेश काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. सेस रद्द केल्यास व्यापारी शहरात मुक्तपणे व्यापार करतील. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन ग्राहकांना किफायत भावात धान्य मिळेल.

सेस रद्द करणे शक्य नाहीबाजार समितीत शेकडा १.०५ पैसे सेस आकारण्यात येतो. हा सेस रद्द करणे शक्य नाही. सेस रद्द झाल्यास बाजार समितीचे संचालन करणे शक्य होणार नाही. सेसच्या माध्यमातून बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे पगार, नवीन कामे, देखरेख खर्चाचे नियोजन करण्यात येते. पूर्वी समितीतील अडतियांनी सेस ५५ पैशांपर्यंत कमी करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यांची मागणी शासनाकडे प्रलंबित आहे. शासनाचा निर्णय मान्य आहे. पण सेस रद्द करण्यात येऊ नये.- प्रशांत नेरकर, उपसचिव व विधी अधिकारी, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती.

टॅग्स :Marketबाजार