शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

‘कॅम्पस’ होणार ‘हाय-फाय’

By admin | Updated: November 25, 2014 00:53 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचे दावे अनेकदा करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी झालीच नाही.

नागपूर विद्यापीठ : संपूर्ण परिसर ‘वाय-फाय’ करण्याचे प्रयत्न सुरूयोगेश पांडे - नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचे दावे अनेकदा करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी झालीच नाही. परंतु आता ‘आयटी रिफॉर्म्स’च्या उंबरठ्यावर असणाऱ्या विद्यापीठाने ‘हायटेक’ पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना सहजपणे एका ‘क्लिक’वर जगातील घडामोडी अन् एखाद्या विषयातील बारकावे जाणता यावेत याकरिता संपूर्ण परिसरात ‘वाय-फाय’ यंत्रणा उभारण्यात येत आहे. यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून लवकरच कुलगुरूंची परवानगी मिळेल. डिसेंबरअखेरीस ही सुविधा पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महात्मा फुले शैक्षणिक परिसरात अनेकदा ग्रंथालय हाऊसफुल्ल असल्याने विद्यार्थी ‘लॅपटॉप’ घेऊन विभागाच्या पायऱ्यांवर अभ्यास करताना दिसतात. परंतु ‘इंटरनेट कनेक्शन’ नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनानेच पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना ‘वाय-फाय’ सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंबंधातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, कुलगुरूंची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात विद्यापीठाचे माध्यम समन्वयक डॉ. श्याम धोंड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ‘वाय-फाय’संदर्भातील प्रस्ताव असून, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या सर्व ठिकाणी ही सुविधा सुरू होईल, अशी आशा आहे. सरकारच्याच योजनेतून ही कल्पना समोर आली असल्याची माहिती त्यांनी दिली.कुठे मिळणार सुविधा?‘वाय-फाय’ इंटरनेट कनेक्शनची ही सुविधा विद्यापीठाचे ग्रंथालय, एलआयटी परिसर, अमरावती मार्गावरील महात्मा फुले प्रशासकीय परिसर (कॅम्पस), लॉ कॉलेज जवळील विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि विद्यापीठाचे मुलींचे वसतिगृह येथे ही ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातील ‘कॅम्पस’ आणि एलआयटी परिसरात ‘बीएसएनएल’च्या माध्यमातून ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. या दोन्ही परिसरासाठी साधारणत: ४७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. ‘बीएसएनएल’ला या ‘प्रोजेक्ट’साठी ८४ लाख रुपये अगोदरच देण्यात आले आहेत. शिवाय इतर ठिकाणी ‘वाय-फाय’सुविधा उभारण्यासाठी लागणारी रक्कम गरज भासल्यास विकास कोष किंवा सामान्य कोषातून टाकण्यात येईल, असेदेखील सूत्रांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना फायदाविद्यापीठाच्या निरनिराळ्या परिसरांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फार लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये ‘स्मार्टफोन’चा वापर वाढीस लागला आहे. त्यामुळे एका ‘क्लिक’वर त्यांना परिसरात कुठेही सहजपणे इंटरनेट वापरता येणार आहे. विशेषत: निरनिराळ्या विभागांमध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ही सुविधा फारच उपयुक्त ठरणार आहे.