शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही हाक द्या, आम्ही सेवेत हजर राहू : महापौर जोशी यांची नागपूरकरांना साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:18 IST

ज्यांना खरंच गरज आहे, त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करू. तुम्ही अडचणीत असाल तर केवळ हाक द्या, आम्ही सेवेत राहू, अशी भावनिक साद महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना घातली.

ठळक मुद्देफेसबुक लाईव्ह मधून दिली प्रश्नांना उत्तरे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरात बाहेर राज्यातील अनेक जण ‘लॉकडाऊन’मध्ये अडकले आहेत. त्यांच्या भोजनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा लोकांनी माझ्या स्वीय सहायकाला फोन करावा. ज्यांना खरंच गरज आहे, त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करू. तुम्ही अडचणीत असाल तर केवळ हाक द्या, आम्ही सेवेत राहू, अशी भावनिक साद महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना घातली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात लॉकडाऊन आहे. १५ एप्रिलपर्यंत सर्वांना घरात राहायचे आहे. यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या शंकांचे निरसन करायचे या उद्देशाने महापौर संदीप जोशी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या काळात नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. नागरिकांनी घरीच राहावे. विनाकारण बाहेर पडू नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी व्यवस्था करीत आहे. किराणा सामान, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळावे, यासाठी प्रत्येक परिसरातील विक्रेत्यांची, दुकानांचे नावे, मोबाईल क्रमांकासह मनपाच्या अधिकृत वेबसाईट, फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. नागरिकांनी या विक्रेत्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून जे हवे आहे, ते घरपोच मागवावे, असे आवाहन त्यांनी केले.आयुक्त फिरतात आपण का फिरत नाही, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, आपण फिरलो तर विनाकारण गर्दी जमा होईल. ते टाळावे म्हणून आपण फिरणे टाळतोय. उद्यापासून माझ्या गाडीवर स्वत:च्या आवाजात नागरिकांना आवाहन करीत फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३१ मार्चला पुन्हा साधणार संवाद३१ मार्च रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत फेसबुकच्या माध्यमातून ते पुन्हा नागरिकांच्या भेटीला येतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSandip Joshiसंदीप जोशी