शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

मौन पदयात्रेतून संवैधानिक सहिष्णुता टिकविण्याची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:28 IST

देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकांनो हे षड्यंत्र ओळखा आणि संविधानाची सहिष्णुता टिकविण्यासाठी एकत्रित या, असा संदेश देताना दक्षिणायानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी दीक्षाभूमीहून मौन पदयात्रा काढली.

ठळक मुद्देदेशभरातील साहित्यिक, विचारवंतांचा सहभाग : दक्षिणायनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकांनो हे षड्यंत्र ओळखा आणि संविधानाची सहिष्णुता टिकविण्यासाठी एकत्रित या, असा संदेश देताना दक्षिणायानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी दीक्षाभूमीहून मौन पदयात्रा काढली.सत्य, अहिंसा व संविधान सुरक्षेचा संदेश देण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी व दक्षिणायनचे डॉ. गणेश देवी यांच्या नेतृत्वात निघालेल्या मौन पदयात्रेत देशभरातील पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे नामवंत साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये कुमार शिराळकर, कुमार केतकर, रावसाहेब कसबे, मेधा पाटकर, मेधा पानसरे, उल्का महाजन, लीलाताई चितळे, डॉ. प्रज्ञा दया पवार, राजन अनवर , विद्या बाळ, शारदा साठे, नागेश चौधरी, धनाजी गुरव, राजन खान, डॉ. क्रिष्णा कांबळे, अमिताभ पावडे, कवी ज्ञानेश वाकुडकर, सुनैना आझाद, भालचंद्र कांगो, अरुणा सबाने, ई. झेड. खोब्रागडे, हरिभाऊ केदार, प्रा. प्रमोद मुनघाटे, जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, विलास भोंगाडे, डॉ. हरीश धुरट, प्रज्ज्वला तट्टे, विभा पुरी दास, के. के. चक्रवर्ती, प्रा. अंजली मायदेव, आसाराम लोमटे, प्रफुल्ल शिलेदार, रजिया पटेल, हमीद दाभोळकर, दामोदर मौझो, दत्ता नाईक, राजन खान, वीरा राठोड, प्रल्हाद लुलेकर, वैशाली रोडे, प्रभु राजगडकर, के. नीला, सुरेखा देवी, भारती शर्मा, मंदार काळे, निशा शिरुरकर, मीनल सोहनी, शिवाजी गायकवाड, अभय कांता, सुधीर देसाई, संदेश प्रभुदेसाई, प्रतिभा शिंदे, निला लिमये, सुनिती धारवडकर, सुरेश सावंत, वसंत एकबोटे, मीनाक्षी बाली, सत्यपाल राजपूत, वनराज तुळजापूरकर, धनंजय कांबळे, नीता साने, शमसुद्दीन तांबोळी, सुनयना अजात, वनराज चावला, पल्लवी चौधरी, चेतना दीक्षित तसेच जमाते इस्लामीचे डॉ. अनवर सिद्दीकी, इरशाद खान, महिला अध्यक्ष डॉ. साबिया यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.सुरुवातीला दीक्षाभूमीवर तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत पदयात्रा सुरू करण्यात आली. हातात देशातील महापुरुषांचे फोटोसह अनेक प्रकारचे संदेश देणारे फलक घेऊन व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांना नमन करण्यात आले. धनवटे नॅशनल कॉलेजला पदयात्रेचे समापन करण्यात आले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर