शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचे राहणीमान सोईचे करणार ‘कॅग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:29 IST

फूटपाथवर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होते, अनेक दुकानदार आपल्या प्रतिष्ठानांसमोर दुकानाचे बोर्ड लावत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो तर पार्किंगमुळे नागरिकांची होणारी गैरसोय....

ठळक मुद्देविवेक रानडे : परिसराला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फूटपाथवर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होते, अनेक दुकानदार आपल्या प्रतिष्ठानांसमोर दुकानाचे बोर्ड लावत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो तर पार्किंगमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता या समस्यांपासून धरमपेठ परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सिव्हीक अ‍ॅक्शन ग्रुप (कॅग) तयार करण्यात आला असूून ‘कॅग’तर्फे नागरिकांचे राहणीमान सोईचे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती विवेक रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.विवेक रानडे म्हणाले, कॅगने आतापर्यंत ट्रॅफिक पार्क परिसरातील हॉकर्सचे अतिक्रमण हटविले आहे. लक्ष्मीभुवन, लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील अतिक्रमण सीताबर्डी पोलिसांच्या सहकार्याने हटविले आहे. धरमपेठ परिसरातील सर्व दुकानांच्या रांगेतील अतिक्रमण हटविण्यात आले. कॅगने १० ते १४ आॅक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या आधार कॅम्पमध्ये ६०० नागरिकांचे आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. भविष्यात कॅगतर्फे धरमपेठ परिसरातील फूटपाथ मोकळे करणे, पार्किंगसाठी जागा ठरवून देणे, अपार्टमेंट, नागरिकांच्या घरासमोर फूटपाथवर टाकण्यात आलेले स्लोप हटविण्यात येणार आहे. कॅगने चार गट तयार केले असून त्यात एक गट अतिक्रमणाच्या विरोधात, दुसरा स्वच्छतेच्या क्षेत्रात, तिसरा जनजागृती आणि चौथा ग्रुपबद्दल लोकांना माहिती देऊन जनसंपर्क प्रस्थापित करणार असल्याचे रानडे म्हणाले. सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार खराबे म्हणाले, नागरी सुविधांबाबत लोकांमध्ये जागृती नसून कॅगतर्फे करण्यात येणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. भविष्यात असे ग्रुप नागपूर शहरात सर्वत्र तयार झाल्यास नागपूर शहर सुंदर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेचे सहायक आयुक्त महेश मोरोणे म्हणाले, कॅग हे नागपूरकरांसाठी रोल मॉडेल आहे. परिसरातील नागरिकांना फूटपाथवर तयार केलेले स्लोप काढून घ्यावेत, हे स्लोप न काढल्यास महापालिका दंडात्मक कारवाई करेल. घरासमोर बांधकामाचा मलबाही नागरिकांनी उचलावा. अन्यथा महापालिका जेसीबीच्या साहाय्याने हा मलबा उचलून त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, जेसीबीचे भाडे हा संपूर्ण खर्च संबंधित घर मालकाकडून वसूल करेल. इमारतीतील पार्किंगच्या जागेचा वापर केवळ पार्किंगसाठीच होणे आवश्यक असून त्याचा इतर कारणांसाठी वापर होत असल्यास महापालिकेतर्फे कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला नचिकेत काळे आणि कॅगचे सदस्य उपस्थित होते.