शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅग’ने योग्य आकडे दिलेच नाही; नागपूर विद्यापीठाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 21:02 IST

‘कॅग’ने अहवालात दिलेली माहिती चूक असून अयोग्य आकडेवारी सादर करण्यात आल्याचा दावा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कुलगुरु डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील ‘कॅग’च्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकुलगुरुंनी व्यक्त केली नाराजीविद्यापीठातील ७० कोटींच्या गोलमालविषयी लोकमतने दिले होते वृत्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे ‘कॅग’च्या (कॉम्पट्रोलर अ‍ॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) अहवालात काढण्यात आले. परंतु नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘कॅग’च्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘कॅग’ने अहवालात दिलेली माहिती चूक असून अयोग्य आकडेवारी सादर करण्यात आल्याचा दावा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कुलगुरु डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील ‘कॅग’च्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘कॅग’च्या अहवालावर आधारित ‘नागपूर विद्यापीठात ७० कोटींचे गोलमाल’ हे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते हे विशेष.‘कॅग’तर्फे ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या वर्षाचा अहवाल राज्य विधीमंडळात सादर करण्यात आला. ‘कॅग’ने २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीची तपासणी करण्यासाठी जानेवारी ते जून २०१७ दरम्यान लेखापरीक्षण केले होते. नागपूर विद्यापीठ निधीच्या आर्थिक व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात उणीवा असून अनेक बाबींमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ‘कॅग’तर्फे ठेवण्यात आला आहे. विद्यापीठ विभाग, परीक्षा केंद्र, कर्मचारी इत्यादींना देण्यात आलेल्या अग्रिमाच्या रकमेपैकी ७० कोटी ९० लाख रुपयांची रक्कम अद्यापही असमायोजित आहे. यातील काही अग्रीम रक्कमेचे समायोजन तर १९८८ पासून प्रलंबित आहे. असा स्थितीत या निधीची अफरातफर होण्याची शक्यता ‘कॅग’तर्फे वर्तविण्यात आली आहे. ‘कॅग’ने विद्यापीठाच्या विविध धोरणांवर ताशेरे ओढत महाविद्यालय संलग्नीकरण प्रक्रियेतील घोळ, शिक्षणप्रणाली, संशोधनातील माघारलेपणा इत्यादींवर अहवालातून बोट ठेवले.यासंदर्भात विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांना विचारणा केली असता त्यांनी अगोदर ‘कॅग’चा अहवालच आला नसल्याचा दावा केला. ज्यावेळी त्यांना विधीमंडळाबाबत माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी ‘कॅग’च्या चमूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यापीठाची पाहणी करायला आलेल्या ‘कॅग’च्या चमूने प्राथमिक अहवालात चुकीचे आकडे दिले होते. आम्ही त्याला आक्षेप घेत ‘एक्झिट मिटींग’मध्ये कागदपत्रे व पुराव्यांनिशी सुधारणा सुचविल्या होत्या. तरीदेखील विद्यापीठाबाबत चुकीची माहिती अहवालात आली, असे डॉ.हिवसे म्हणाले.माझे संशोधन कुठे गेले ?‘कॅग’च्या अहवालात विद्यापीठातील संशोधनावर ताशेरे ओढण्यात आले आहे. विद्यापीठात ५ वर्षांत कुठलेही संशोधन प्रसारित झाले नाही, असे नमूद आहे. मात्र इतर शिक्षकांचे सोडा, मात्र मी स्वत: संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. कुलगुरू म्हणून माझे संशोधनदेखील त्यांना दिसले नाही का, असा प्रश्न कुलगुरूंनी उपस्थित केला. विशेष म्हणजे २०१२-१३ ते २०१६-१७ यादरम्यान विद्यापीठाच्या कामगिरीवरुनच ‘नॅक’ने विद्यापीठाला ‘अ’ दर्जा दिला. ‘नॅक’समोर सादर केलेली आकडेवारीच ‘कॅग’ला दिली होती. अहवाल अंतिम होण्याअगोदरदेखील आम्हाला ‘कॅग’च्या चमूने काहीच कळविले नाही, असे डॉ.काणे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ