शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काेळसा वाहतुकीचे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील बसस्थानक परिसरात केलेल्या कारवाईमध्ये काेळशाची चाेरटी वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील बसस्थानक परिसरात केलेल्या कारवाईमध्ये काेळशाची चाेरटी वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात वाहनचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

सोनू ऊर्फ अंकित महेंद्र मराठे (२६, रा. धरमनगर, दुर्गादेवी मंदिराजवळ, कन्हान ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी वाहनचालकाचे नाव आहे. कामठी (जुनी) पाेेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कन्हानहून नागपूरच्या दिशेने काेळशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी शहरातील बसस्थानक परिसरात वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात पाेलिसांनी संशय आल्याने कन्हानहून नागपूरच्या दिशेने जात असलेले एमएच-३१/एएच-१३४४ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली.

त्या वाहनात काेळसा असल्याचे आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. त्यात वाहनातील काेळसा हा चाेरीचा असल्याचे तसेच त्या काेळशाच्या वाहतुकीचे चालकाकडे कागदपत्र नसल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून वाहन व काेळसा ताब्यात घेतला. या कारवाईमध्ये एक लाख रुपयाचे वाहन आणि पाच हजार रुपये किमतीचा काेळसा असा एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक फाैजदार रंगराजन पिल्ले, महेश कठाणे, पंकज मानसिंगे व स्वाती चेटोले यांच्या पथकाने केली.