शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट तातडीने खरेदी करा; हायकोर्टाचा सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 09:26 IST

कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट खरेदी करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे.

ठळक मुद्देलालफीतशाहीपासून दूर राहण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट खरेदी करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. तसेच, या खरेदीला विलंब होऊ नये याकरिता सरकारने लालफीतशाहीपासून दूर राहावे, अशी सूचना केली आहे.केंद्र सरकारद्वारे न्यायालयाला देण्याता आलेल्या माहितीनुसार, इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने १३ कंपन्यांच्या रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट किटना मान्यता प्रदान केली आहे. तसेच, किट खरेदीच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. आता राज्य सरकारला किट खरेदी करण्यासाठी कौन्सिलवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ते थेट मान्यताप्राप्त कंपन्यांकडून किट खरेदी करू शकतात. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता हा आदेश दिला. कोरोनाच्या प्राथमिक चाचणीकरिता रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट अत्यंत उपयोगी आहे. या किटचा अहवाल लवकर येतो. परिणामी, प्रशासनाला कोरोना संक्रमण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करता येईल, असे मत न्यायालयाने हा आदेश देताना व्यक्त केले. प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात शिवराय कुलकर्णी यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पुढील सुनावणी २६ मे रोजी निश्चित करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. पंकज नवलानी, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय