चार नगरसेवकांचे तिकीट कापले जागा वाटपावरून काँग्रेस-भाजपामध्ये घमासान झाले असतानाच बसपाही यात मागे नाही. बसपामध्ये जागा वाटपावरून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी आहे. बसपाने चार नगरसेवकांना डच्चू दिला आहे. इतकेच नव्हे तर तिकिटांचे दावेदार असलेल्या तीन माजी नगरसेवकांनाही पक्षाच्या तिकिटापासून वंचित राहावे लागले. परंतु दक्षिण-पश्चिममधील अयोध्यानगर येथील एका दावेदाराला उत्तर नागपुरातील एका प्रभागातून तिकीट मिळाल्याची माहिती आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत बसपाचे इच्छुक उमेदवार व पदाधिकारी पक्षाच्या एबी फॉर्मसाठी प्रतीक्षा करीत होते. यादरम्यान पक्षाचे दावेदार मध्यस्थांच्या संपर्कातही होते. त्यांच्यातील बोलचालही काही कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केली आहे. असंतुष्ट कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, सकाळी ९ वाजतापासून बोलावून एबी फॉर्म वाटण्यात आले. पश्चिम नागपुरातून बसपाच्या शहर पदाधिकाऱ्यांची तिकीटही कापण्यात आली. मागील दोन निवडणुकांमध्ये हे पदाधिकारी दुसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यांच्या ठिकाणी सामान्य वर्गातून भाजपकडून तिकीट मागणाऱ्या एका पदाधिकाऱ्याला बसपाने वेळेवर तिकीट दिले. शुक्रवारी सकाळपासून बसपा तिकीट वितरण समितीचे एक ज्येष्ठ पदाधिकारी नाराज होऊन बैठकीतून उठून गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे बसपामध्ये विद्रोहाचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.
बसपातही गोंधळ
By admin | Updated: February 4, 2017 02:39 IST