लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या मध्य प्रदेशातील एका तरुण व्यावसायिकाने नागपुरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. शुभम संजयकुमार बडफूल (वय २४) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे.बडफूल हे मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील केतली येथील रहिवासी होते. त्यांचा नेमका कशाचा व्यवसाय होता, हे स्पष्ट झाले नाही, मात्र, ते व्यापारी होते, असे पोलीस सांगतात. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ते वर्धा मार्गावरील परलिन हॉटेलमध्ये आले. त्यांनी दुसऱ्या माळ्यावर २०२ क्रमांकाची खोली भाड्याने घेतली. सोमवारी दुपारपर्यंत त्यांच्या रुमचे दार उघडले न गेल्यामुळे हॉटेल प्रशासनाने त्यांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सोनेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी हॉटेल प्रशासनाच्या मदतीने खोलीचे दार उघडले असता बडफूल सिलींग फॅनला गळफास लावून लटकताना दिसले. त्यांच्या बॅगची तपासणी केली असता काही रक्कम आणि कागदपत्रांसह एक चिठ्ठीही पोलिसांना आढळली. चुकीच्या व्यवहारामुळे अनेकांचे कर्ज झाले. ते परत करणे शक्य नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून सर्वांची माफी मागितली आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना या बाबत माहिती देऊन नागपुरात बोलवून घेतले. प्रमोद इंद्रसिंग जंगेल (वय ३९, रा. शताब्दी चौक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.यशोधरानगरातील इसमानेही लावला गळफासयशोधरानगरातील इंदिरा माता नगरात राहणारे अत्तरसिंग मूनसिंग कुंभरे (वय ४१) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ताराबाई पांडुरंग सिडामे (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
मध्य प्रदेशातील व्यावसायिकाची नागपुरात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:43 IST
कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या मध्य प्रदेशातील एका तरुण व्यावसायिकाने नागपुरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
मध्य प्रदेशातील व्यावसायिकाची नागपुरात आत्महत्या
ठळक मुद्देहॉटेलमध्ये लावला गळफास : कर्जबाजारीपणामुळे घेतला टोकाचा निर्णय