शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉलवरील बस वाडी नाक्यावर पोहचली

By admin | Updated: July 31, 2014 01:10 IST

स्वीडनची स्कॅनिया कंपनी महापालिकेला प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर चालणाऱ्या पाच बसेस उपलब्ध करणार आहे. मनपाच्या परिवहन विभागामार्फत या बसेस चालविल्या जाणार आहे. १६ आॅगस्टला बसचे

महापालिका : १६ आॅगस्टला लोकार्पणनागपूर : स्वीडनची स्कॅनिया कंपनी महापालिकेला प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर चालणाऱ्या पाच बसेस उपलब्ध करणार आहे. मनपाच्या परिवहन विभागामार्फत या बसेस चालविल्या जाणार आहे. १६ आॅगस्टला बसचे लोकार्पण होणार आहे. ही बस बुधवारी वाडी नाक्यावर पोहचली आहे. महापौर अनिल सोले यांनी या बसचे अवलोकन केले. मनपातील सत्तापक्षनेते प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, प्रकाश तोतवाणी आदी यावेळी उपस्थित होते. इथेनॉलवर चालणारी ही देशातील पहिलीच बस आहे. पहिल्या टप्प्यात तीन महिने ही बस चालविली जाईल. त्यानंतर पुन्हा चार बसेस मिळतील. या बसेस मोफत मिळणार असल्याने मनपावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. या बसमुळे प्रदूषणाला आळा बसण्याला मदत होईल. पहिल्या टप्प्यात ही बस विमानतळ ते सीताबर्डी दरम्यान चालविण्याचा विचार आहे. सोबतच अन्य मार्गावर चालविण्याचा विचार केला जात असल्याचे सोले यांनी सांगितले. या बसेस चालविण्यासाठी चालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही बस वातानुकूलित असून ३७ आसनी आहे. तसेच १२ प्रवासी उभे राहू शकतील. बसमध्ये हायड्रोलिक यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. सुविधा म्हणून बसची चाके खाली-वर करता येतात. वृद्धांना बसमधून उतरण्यासाठी जमिनीपर्यत शिडीची व्यवस्था आहे. बसच्या मागेपुढे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या बसचे भाडे राज्य परिवहन महामंडळामार्फत ठरविले जाणार आहे. लोकार्पण समारंभाला केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान व केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर आदी उपस्थित राहतील.(प्रतिनिधी)