शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांचे नाव घेऊन जात पडताळणी अधिकारी मागतात लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:10 IST

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणीत आणणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर विधानपरिषदेत सोमवारी वातावरण चांगलेच तापले. मुंबईतील नगरसेवकाला जात पडताळणीसाठी समितीच्या अध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अ‍ॅड.अनिल परब यांनी लावला.

ठळक मुद्देअनिल परब यांचा आरोप : विधानपरिषद सभापतींनी दिले निलंबन करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणीत आणणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर विधानपरिषदेत सोमवारी वातावरण चांगलेच तापले. मुंबईतील नगरसेवकाला जात पडताळणीसाठी समितीच्या अध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अ‍ॅड.अनिल परब यांनी लावला. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांनी सामाजिक न्याय व विकासमंत्री राजकुमार बडोले यांचे नाव समोर करत हा प्रकार केल्याचे प्रतिपादन परब यांनी केले. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही बाब गंभीरतेने घेतली व तिन्ही अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले.जात वैधता प्रमाणपत्राच्या पडताळणीला उशीर होत असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने वटहुकूम जारी केला होता. जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा विधेयक आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी मांडले. या विधेयकावर चर्चा सुरू झाल्यानंतर अनिल परब यांनी मुंबईतील नगरसेवक सगुण नाईक यांच्याकडून चित्रा सुर्यवंशी, अरविंद वळवी व अविनाश देसरवाल या अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती. मंत्र्यांचे नाव समोर करुन भ्रष्टाचार करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी परब यांनी केली आहे. जात पडताळणी समिती ही पैसे दिल्यास प्रमाणपत्र देते, तर पैसे न दिल्यास प्रमाणपत्र अवैध ठरवते. यामुळे ही समिती बरखास्त करावी, अशीदेखील मागणी त्यांनी केली.सभागृहात इतर सदस्यांनीदेखील जात पडताळणी समितीतील विविध गैरप्रकार कसे चालतात याबाबत भावना मांडल्या. यात धनंजय मुंडे, हेमंत टकले, भाई जगताप, हरीभाऊ राठोड, जोगेंद्र कवाडे, सुजितसिंह ठाकूर, सुरेश धस, प्रवीण दरेकर, प्रकाश गजभिये इत्यादी सदस्यांचा समावेश होता. सभापतींनी याची गंभीर दखल घेत तिन्ही अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्याचे निर्देश सरकारला दिले. जात पडताळणी समितीमधील भ्रष्टाचार आणि गैरकारभार रोखण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती स्थापन केली जाईल, यासाठी मी विधानसभा अध्यक्षांशी बोलेन. येत्या दोन महिन्यात समितीची बैठक होऊन त्यात सर्वंकष असे निर्णय घेतले जातील, असे सभापतींनी सभागृहाला आश्वासन दिले. दरम्यान या सुधारणा विधेयकाला सभागृहाने मंजुरी दिली.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Corruptionभ्रष्टाचार