शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सिंचन घोटाळ्यातील आरोपींना दणका

By admin | Updated: March 23, 2017 17:42 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सिंचन घोटाळ्यातील ८ आरोपींना दणका देऊन त्यांच्याविरुद्ध दाखल

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 23 - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सिंचन घोटाळ्यातील ८ आरोपींना दणका देऊन त्यांच्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे ७ आरोपींनी अर्ज मागे घेतले तर, एका आरोपीचा अर्ज न्यायालयाने खारीज केला.आरोपींमध्ये आर. जे. शाह अ‍ॅन्ड कंपनी मुंबईच्या संचालिका कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, त्यांचे भागिदार डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जिगर प्रवीण ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते व विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जिभकाटे यांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींवर कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचा अंतरिम आदेश कायम ठेवला असून हा आदेश संबंधित न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यापासून एक महिन्यापर्यंत लागू राहणार आहे.मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्यात या ८ आरोपींचा समावेश आहे. सदर एफआयआर अवैध असून तो रद्द करण्यात यावा अशा विनंतीसह आरोपींनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. जिभकाटे यांचा अर्ज खारीज झाला तर, अन्य आरोपींनी अर्ज मागे घेतले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. आरोपींतर्फे दिल्ली येथील वरिष्ठ वकील चितळे, वरिष्ठ वकील अनिल मार्डिकर, अ‍ॅड. आनंद परचुरे, अ‍ॅड. शशिभूषण वहाणे, अ‍ॅड. संग्राम सिरपूरकर तर, शासनातर्फे मुख्य अधिवक्ता भारती डांगरे यांनी कामकाज पाहिले.