शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सडकछाप मजनूची गुंडगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सडकछाप मजनूने एका घरावर हल्ला करून चाकूच्या धाकावर दोन बहिणींसह त्यांच्या वडिलांनाही मारहाण केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सडकछाप मजनूने एका घरावर हल्ला करून चाकूच्या धाकावर दोन बहिणींसह त्यांच्या वडिलांनाही मारहाण केली. वडिलांनी प्रतिकार केला असता आरोपीने चाकूहल्ला केल्याने योगेश उरकुडे हे गंभीर जखमी झाले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही घटना घडली.

गाैरव ठाकूर असे आरोपीचे नाव असून तो पारडीच्या राममंदिराजवळ राहतो. गुलमोहर नगरातील योगेश उरकुडे यांच्या घरात बुधवारी रात्री ८ वाजता आरोपी ठाकूर जबरदस्तीने शिरला. यावेळी योगेश आणि त्यांच्या दोन मुली घरात होत्या. मुलींनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले असता आरोपी जुमानत नव्हता. तो हमरीतुमरीवर आल्याने आणि त्याचे कलुषित मनसुबे ध्यानात आल्याने योगेश यांनी त्याला जबरदस्तीने घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीने त्यांच्या मांडीवर चाकूचा घाव घातला. त्यामुळे मुलींनी आरडाओरड करत आरोपीचा विरोध केला. आरोपी ठाकूरने मुलींनाही मारहाण केली. मुलींनी त्याला बाहेर हुसकावून दार बंद केले असता आरोपीने दारावर दगड मारले. नंतर आजूबाजूची मंडळी जमल्याचे पाहून अश्लील शिवीगाळ करत आरोपी पळून गेला. या प्रकरणी योगेश उरकुडे यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गाैरव ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--

विनयभंगाचे कलम नाही

विशेष म्हणजे, आरोपीने मुलींना धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ करूनही त्याच्यावर विनयभंगाचे कलम मात्र पोलिसांनी लावले नाही.

----