शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यापाऱ्याला भरदिवसा लुटले

By admin | Updated: July 5, 2017 01:35 IST

पाचपावलीतील एका सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून दोन लुटारूंनी त्यांना बॅटने बेदम मारहाण केली.

डोळ्यात तिखट फेकले १० लाखांचा ऐवज लंपास पाचपावलीत लुटमारलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावलीतील एका सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून दोन लुटारूंनी त्यांना बॅटने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळचे १८१ गॅ्रम सोन्याचे दागिने, दोन लाखांची रोकड आणि सहा किलो चांदीसह सुमारे १० लाखांचा ऐवज लंपास केला. अत्यंत वर्दळीच्या वैशालीनगर मैदानाजवळ मंगळवारी दुपारी १२. ३० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.बंडूजी कुंभारे (वय ५५) हे सराफा व्यावसायिक वैशालीनगरातील हनुमान सोसायटीत राहतात. घरापासून ३०० फूट अंतरावर त्यांचे आकाश ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घरून दुकानात जाण्यासाठी आपल्या अ‍ॅक्टीव्हाने निघाले. बाजूच्या मैदानातून अचानक दोन लुटारू त्यांच्या समोर आले. त्यांनी तोंडावर रुमाल बांधले होते. त्यांनी कुंभारे यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. धोका लक्षात आल्यामुळे त्यांनी अ‍ॅक्टीव्हा सोडून खांद्याला अडकवलेली सोन्याचे दागिने असलेली बॅग घट्ट पकडून आरडाओरड केली. ते पाहून लुटारूंनी त्यांना क्रिकेट खेळण्याच्या बॅटने बेदम मारहाण केली. जबर दुखापत झाल्याने हतबल होऊन खाली पडलेल्या कुंभारेजवळची सोन्याची दागिने असलेली बॅग आणि अ‍ॅक्टीव्हा घेऊन लुटारू पळून गेले. अ‍ॅक्टीव्हाच्या डिक्कीमध्ये दोन लाखांची रोकड, ६ किलो चांदीची भांडी आणि दागिने असलेली एक बॅग होती. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. कुंभारेंना लुटल्या जात असल्याचे पाहून मैदानातील मुलांनीही आरडाओरड केली. त्यामुळे बाजूची मंडळी धावली. त्यांनी कुंभारेच्या तोंडावर पाणी मारून त्यांच्या डोळ्यातील मिरची पावडर साफ केली. पाचपावली पोलिसांना कळवून कुंभारेंना बाजूच्या रुग्णालयात नेण्यात आले. क्रिकेटर बनून केली रेकी लुटारुंनी ही लुटमार करण्यासाठी दोन दिवस क्रिकेटर बनून कुंभारे यांची रेकी केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या मैदानात मुले नेहमी क्रिकेट खेळतात. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यासाठी लुटारूंनी मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांशी मैत्री केली. त्यानंतर हे लुटारु गेल्या दोन दिवसांपासून या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागले. हे करतानाच ते कुंभारेच्या जाण्यायेण्यावर लक्ष ठेवून होते. त्यांच्यासोबत किंवा मागेपुढे कुणीच नसतो, हे ध्यानात आल्यामुळे त्यांनी कुंभारेंना लुटण्याचा कट रचला. ठरवल्याप्रमाणे ते मंगळवारी घटनेच्या अर्ध्या तासापूर्वी मैदानात येऊन मुलांसोबत क्रिकेट खेळू लागले. त्यानंतर कुंभारे दुकानाकडे जाताना दिसताच बॅटिंग करणाऱ्या मुलाच्या हातातील बॅट हिसकावून ते कुंभारेच्या समोर आले आणि त्यांनी लुटमार केली. आरोपी सीसीटीव्हीत कैद माहिती कळताच पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनीही कुंभारेंची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी लुटारूंचा शोध घेण्यासाठी या भागातील अनेकांकडे चौकशी केली. एवढेच नव्हे तर लुटारू पळालेल्या मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेजही तपासले. त्यातील एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत लुटारू कैद झाले. त्यांनी तोंडावर कापड बांधले असल्यामुळे त्यांचा चेहरा ओळखण्यास अडचण येत आहे.