शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सराफांवर १४ जूनपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:08 IST

- हायकोर्टाचे आदेश : जीजेसीची हॉलमार्किंग सक्तीसंदर्भात याचिका नागपूर : देशात हॉलमार्किंगचे दागिने न विकणाऱ्या सराफांवर भारतीय मानक ब्यूरोने ...

- हायकोर्टाचे आदेश : जीजेसीची हॉलमार्किंग सक्तीसंदर्भात याचिका

नागपूर : देशात हॉलमार्किंगचे दागिने न विकणाऱ्या सराफांवर भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) १४ जूनपर्यंत कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी सुनावणीदरम्यान दिले.

१ जूनपासून संपूर्ण देशात सराफांना हॉलमार्किंगचे दागिने विकण्याची सक्ती केली आहे. या संदर्भात केंद्र शासनाने कायदा केला आहे. या कायद्याला आव्हान देणारी याचिका ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी डोमॅस्टिक कौन्सिल (जीजेसी), भैयाजी रामभाऊ रोकडे ज्वेलर्स आणि राजेश भैयाजी रोकडे यांनी ३० एप्रिलला हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. या आदेशामुळे देशातील सर्व सराफांना दिलासा मिळाला आहे. याचिकेवर १४ जूनला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्तींनी सर्व प्रतिवादींना उत्तरासाठी नोटिसा जारी केल्या आहेत.

दागिन्यांच्या हॉलमार्किंगकरिता देशात पुरेसे सेंटर नाहीत. देशातील ७३३ राज्यांपैकी ४८८ जिल्ह्यात हॉलमार्क सेंटर नाहीत. त्यामुळे सराफांना दागिने हॉलमार्क करणे शक्य नाही. संपूर्ण पायाभूत सुविधा नसतानाही केंद्र सरकार हॉलमार्किंग कायदा सक्तीचा करीत आहे. सध्या लॉकडाऊनची स्थिती असून सराफांची दुकाने बंद आहेत. सराफांकडे सर्व कॅरेटचे दागिने विक्रीविना पडून आहेत. हॉलमार्किंगमध्ये सराफांना केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटचे दागिने विकण्याची परवानगी राहणार आहे. विपरित परिस्थिती असताना हॉलमार्किंग बंधनकारक करणे योग्य नसल्याचे मत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात ऑनलाईन मांडले. दोन्ही बाजूची मते ऐकून न्यायमूर्तींनी १४ जूनपर्यंत हॉलमार्किंग दागिन्यांसंदर्भात बीआयएसने सराफांवर कारवाई करू नये, असे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रोहन शाह यांनी बाजू मांडली.