शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुली रिसोर्टला वन विभागाकडून ‘क्लीन चिट’

By admin | Updated: June 21, 2015 03:02 IST

वनकायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सत्यजित विक्रमसिंग मोहब्बतसिंह तुली यांना वन विभागाने (वन्यप्राणी विभाग) ‘क्लीन चिट ’ दिली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे सर्वेक्षण : वनकायद्याचे पालननागपूर : वनकायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सत्यजित विक्रमसिंग मोहब्बतसिंह तुली यांना वन विभागाने (वन्यप्राणी विभाग) ‘क्लीन चिट ’ दिली आहे. वनसीमेवर कचरा जाळणे व सीमा उद्ध्वस्त करण्याचा आरोप करून वन विभागाने भारतीय वन्यजीव अधिनियमांतर्गत तुली यांच्याविरुद्ध यावर्षीच्या जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. देवलापार हद्दीत सावरा बीट (वन्यप्राणी) या राखीव वनाच्या सीमेलगत मौजा बांद्रा येथे ७.८३ हेक्टर जमिनीवर तुली यांचे तुली बिरबाग या नावाने रिसोर्ट आहे. रिसोर्टलगत संरक्षित वनक्षेत्र आहे. सीमा उद्ध्वस्त करणे, प्लास्टिक बाटल्या फेकणे आणि कचरा जाळण्याच्या आरोपाखाली भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलम २७ (४), ३०, ३२ चा भंग झाल्याचे सांगून रेंज वन अधिकारी (वन्यप्राणी) डी.एन. तोंडे यांनी तुली यांच्याविरोधात १२ जानेवारी २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तुली यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. त्यानुसार नागपूर वनविभाग, आरएफओ आणि देवलापार क्षेत्रीय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितरीत्या रिसोर्ट असलेल्या शेताचे सर्वेक्षण करून गावातील चार जणांसमोर १३ जून २०१५ रोजी पंचनामा केला होता. तुली यांच्या शेताच्या चारही बाजूचे सर्वेक्षण आणि मोजणी करण्यात आली. तुली यांचे रिसोर्ट त्यांच्या सीमेच्या आत असून मोजणीत अतिक्रमण आढळून आले नाही, शिवाय कोणत्याही प्रकारच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या नाही तसेच पिशव्या व कचरा जंगलामध्ये जळालेला नसल्याचा अहवाल देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. शेख यांनी नागपूर विभागीय मुख्य वनसंरक्षकांना १३ जून रोजी दिला. याप्रकरणी वन्यजीव विंगने चौकशी केली होती. प्रकरणाची शहानिशा करून पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूरचे वनसंरक्षक व क्षेत्र संचालकांनी सत्यजित विक्रमसिंह मोहब्बतसिंग तुली यांच्याकडून १५ जून २०१५ रोजी १५ हजार रुपये उपद्रव्य शुल्क आकारून हे प्रकरण नस्ती बंद करण्यात येत असल्याचे सांगितले. शुल्क आकारणीची प्रत देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) आणि पेंच व्याघ्र प्रकल्प आणि नागपूरचे उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात आली.मोहब्बतसिंह तुली यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, रिसोर्टमध्ये २३ कॉटेज आहेत. संपूर्ण परिसरात दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. बांधकाम सीमेच्या आत असून आम्ही वन कायद्याचे कुठलेही उल्लंघन केलेले नाही. तोंडे यांनी आमच्यावर आकसपूर्ण कारवाई करून आमच्याविरुद्ध वन कायद्याखाली गुन्हा नोंदविल्याचा आरोप त्यांनी केला. तुली म्हणाले, हे रिसोर्ट नागपुरात ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ या इव्हेंटमध्ये केलेल्या घोषणेनुसार सुरू केले. रिसोर्टमध्ये या परिसरातील ८० टक्के आदिवासींना रोजगार दिला आहे. (प्रतिनिधी)