शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील केळीबाग रोडवर चालला बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:44 IST

केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेली दुकाने हटविण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या अधीन असलेल्या महालातील या २३ दुकानांपैकी १६ दुकाने बुधवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली. कारवाईदरम्यान बडकस चौक ते कोतवाली ठाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. बाजार विभाग, अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने ही दुकाने तोडली.

ठळक मुद्दे१६ दुकाने जमीनदोस्त : व्यापाऱ्यांमध्ये आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेली दुकाने हटविण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या अधीन असलेल्या महालातील या २३ दुकानांपैकी १६ दुकाने बुधवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली. कारवाईदरम्यान बडकस चौक ते कोतवाली ठाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. बाजार विभाग, अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने ही दुकाने तोडली.आठवडाभरापूर्वी बाजार विभाग व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व अधिकारी दुकाने पाडण्यासाठी गेले होते. त्यावेळी व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवत तीव्र विरोध केला होता. विरोध पाहता पथक कारवाई न करताच परतले होते. यानंतर महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी व्यापाऱ्यांना १ आॅगस्टपर्यंत दुकाने रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. संबंधित दुकानदारांना यापूर्वीच दुकाने खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी कारवाई करण्यात आली. सायंकाळपर्यंत दुकाने तोडण्याचे काम सुरू होते. कारवाईदरम्यान मेघा मॅचिंग सेंटर, मयताच्या सामानाचे दुकान, फाईन कलेक्शन, नंदकिशोर पुस्तक भंडार, अजंता साडी, संगीता साडी, अमित ड्रेसेस, नरसापूरकर रेडिमेड, मनपसंद कलेक्शन, लवली ड्रेसेस, पूजा साडी सेंटर, सत्यम ड्रेसेस, अनूप ड्रेसेस, सुनील कलेक्शनची इमारत तोडण्यात आली. बाजार विभागाचे सहायक आयुक्त विजय हुमणे, सहायक आयुक्त अशोक पाटील, मदन सुभेदार आदी या वेळी उपस्थित होते.रस्ता होणार ८० फूट रुंद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित रस्ता आता ८० फुटाचा होणार आहे. त्यामुळेच दुतर्फा असलेली दुकाने तोडली जात आहेत. यात अडथळा निर्माण करणाऱ्या महापालिकेच्या मालमत्ता आधी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या क्रमात गांधीबाग झोन कार्यालयाची इमारत, कर्मचारी पतसंस्था कार्यालयाची भिंत, पार्किंग कॉम्प्लेक्ससमोरील भिंत महापालिकेने पाडली होती.व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी केळीबाग रस्ता रुंदीकरणात दुकाने तोडण्यात येत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. काही लोकांना फायदा पोहचविण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. महाल बाजार ही नागपूरची ओळख होती. ती ओळख दुकानांसोबत जमीनदोस्त करण्यात आली आहे. सुमारे सव्वा किलोमीटर लांब या रस्त्यावरील बांधकामे हटविण्यासाठी महापालिकेला बरीच कसरत करावी लागणार आहे. जर मोबदला दिला गेला तर ही रक्कम १०० कोटींच्या आसपास जाईल.सीताबर्डी, गोकुळपेठेत कारवाईदरम्यान तणाव धरमपेठ झोनतर्फे बुधवारी गोकुळपेठ मार्केट व सीताबर्डी येथील अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईदरम्यान दुकानदार व विक्रेत्यांनी तीव्र विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारातील अतिक्रमण हटविण्यास सकाळी सुरुवात झाली. येथील फूटपाथवरील ४० अतिक्रमण हटविण्यात आले. १९ दुकानांचे अतिक्रमण तोडण्यात आले. या कारवाईमुळे गोकुळपेठ मार्केटमध्ये धावपळ माजली. कारवाई पाहून दुकानदारांनी स्वत:च आपले शेड व फूटपाथवर ठेवलेले सामान हटविले. यानंतर पथकाने सीताबर्डी मोदी नंबर तीनमध्ये कारवाई केली. येथे दुकानासमोर पक्के अतिक्रमण करण्यात आले होते. जेसीबीच्या मदतीने ते तोडण्यात आले. दुकानदारांचे ओटे, जाहिरात फलक, अन्य बांधकाम तोडण्यात आले. रस्त्यावर दुकान थाटणाऱ्यांचे सामानही जप्त करण्यात आले. सुमारे तीन ट्रक माल जप्त करण्यात आला.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणMahalमहाल