शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालये उभारणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 10:06 IST

वर्तमान व भविष्यातील गरज हेरून सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालये उभारण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढे यावे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी शुक्रवारी सांगितले.

ठळक मुद्दे सरकारने पुढे येण्याची वेळ आल्याचे सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आवश्यक आर्थिक तरतूद होत नसल्यामुळे असंख्य रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत नाहीत. अशावेळी सरकारी रुग्णालयांमध्ये महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा न मिळाल्यास त्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे वर्तमान व भविष्यातील गरज हेरून सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालये उभारण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढे यावे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी शुक्रवारी सांगितले.उच्च न्यायालयाने शुक्रवारी कोरोनासंदर्भातील प्रकरणावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यात न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले. सर्व रुग्णांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध झाले पाहिजे. हे काम राज्य सरकारने करणे आवश्यक आहे. तेव्हाच गरजू रुग्णांना स्वत:चे प्राण वाचवता येतील. सध्या नागपूरमध्ये सर्वत्र रुग्णालये आहेत. परंतु, शहराच्या सीमेवर आवश्यक रुग्णालये नाहीत. त्यामुळे बाहेरच्या रुग्णांना वाहतूक समस्यांना तोंड देत शहरातील रुग्णालयात भरती व्हावे लागते. त्यात बरेचदा विलंब होऊन रुग्ण दगावतात. त्यामुळे बाहेरून येणाºया रुग्णांना शहरात प्रवेश करण्याची गरज भासायला नको. त्यांना शहराच्या सीमेवरच सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालय उपलब्ध झाले पाहिजे याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.शेजारच्या राज्यांतील रुग्ण नागपूरवर अवलंबूननागपूर शहर देशाच्या हृदयस्थळी वसले आहे. हे शहर परिवहन व दूरसंचार सुविधांनी देशाच्या इतर भागाशी भक्कमपणे जुळलेले आहे. त्यामुळे केवळ विदर्भच नाही तर, मध्य प्रदेश व छत्तीसगड या शेजारी राज्यातील रुग्णही नागपूरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी येतात. त्यामुळे नागपूर मेडिकल हब झाले आहे, असे न्यायालयाने सांगितले.स्थानिक प्रशासनाकडे योजना नाहीनागपूरमध्ये सर्वत्र वैद्यकीय सुविधा पसरल्या आहेत. रुग्णालये असलेल्या घनदाट वस्त्यांमध्ये वाहतूक कोंडी व इतर समस्या भेडसावत आहेत. असे असताना स्थानिक प्रशासनाच्या डोक्यात काहीच प्रभावी योजना नाही, असे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले. कोरोनाबाधित रुग्ण घनदाट वस्त्यांमधील रुग्णालयात भरती होत असल्यामुळे आणि ते परिसरात वावरत असल्यामुळे कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे असेही न्यायालय म्हणाले. 

 

 

 

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय