शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलाच्या धाकावर ५० लाखांच्या खंडणीसाठी बिल्डरचे कुटुंबीय ओलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर ५० लाखांची खंडणी वसूल करण्यासाठी एका आरोपीने हुडकेश्वरमधील एका बिल्डरच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर ५० लाखांची खंडणी वसूल करण्यासाठी एका आरोपीने हुडकेश्वरमधील एका बिल्डरच्या कुटुंबीयांना तब्बल दोन तास ओलीस ठेवले. खंडणीची रक्कम मिळावी म्हणून तो महिला-मुलीवर पिस्तूल ताणून त्यांना वारंवार जिवे मारण्याची धमकी देत होता. त्याचा विक्षिप्तपणा लक्षात घेऊन पोलिसांनीही अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. त्याची बेदम धुलाई करून त्याला नंतर अटक करण्यात आली. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिपळा फाटा परिसरात शुक्रवारी दुपारी हा थरारक घटनाक्रम घडला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

पिपळ्यातील क्रिएटिव्ह को-ऑपरेटिव्ह सोसायटी या बहुमजली इमारतीत बिल्डर राजू रघुनाथ वैद्य (वय ५१) यांचे निवासस्थान आहे. शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास बुरखा घालून असलेला आरोपी जितेंद्र तुळशीराम बिसेन (वय १९) वैद्य यांच्या घरात शिरला. यावेळी वैद्य यांच्या घरात तळमाळ्यावर त्यांची वृद्ध आई वत्सलाबाई, वहिनी वैशाली आणि पुतणी स्वाती होती, तर पहिल्या माळ्यावर राजू यांची पत्नी हर्षल, मुलगा विहान आणि पुतणी धनश्री होती. आरोपी बिसेनने घराची दारे-खिडक्या आतून लावून घेतली. त्यानंतर तळमाळ्यावर वत्सलाबाई, वैशाली आणि स्वातीला पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून आरोपीने ५० लाख रुपये मागितले. ‘खंडणी मिळाल्याशिवाय तुमची सुटका होणार नाही. पोलिसांना कळविले तर जीव गमवावा लागेल’, अशी धमकी आरोपीने घरातील सर्वांनाच दिली. त्यामुळे घरातील महिला आणि मुली हादरल्या. त्या दहशतीत आल्याचे पाहून आरोपीने त्यांना रकमेची जमवाजमव करण्यासाठी नातेवाईकांना फोन करण्यास सांगितले. त्यानुसार स्वातीने राजू वैद्य यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. राजू यांनी आरोपी बिसेनसोबत बोलताना घरातील सदस्यांना काहीही करू नको, तुझी पैशाची व्यवस्था करून देतो, असे सांगितले. त्यांनी लगेच ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना दिली. दरम्यान, पिस्तुलधारी गुन्हेगाराने बिल्डरचे कुटुंबीय घरात डांबून ठेवल्याचे वृत्त वायुवेगाने परिसरात पोहोचले. त्यामुळे वैद्य यांच्या घरासमोर अल्पावधीतच बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर आरोपीने वृद्ध महिला व मुलीला ओलीस ठेवल्याची माहिती वरिष्ठांना कळताच हुडकेश्वर तसेच आजुबाजूच्या पोलीस ठाण्यांतील ताफा तिकडे पाठविण्यात आला. गुन्हे शाखेचा पोलीस ताफा, शीघ्र कृती दलाचे जवान, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने हेदेखील तेथे पोहोचले.

---

ऑपरेशन सुरू...

आरोपीला पैसे घेण्याच्या बहाण्याने बाहेर काढण्याचे पोलिसांनी प्रयत्न केले; मात्र तो खिडकीतूनच पैशाची मागणी करीत होता. आतमध्ये कुणी आल्यास गोळी झाडून ठार मारेन, अशी धमकी देत होता. त्यामुळे ऑन द स्पॉट ऑपरेशनची तयारी करण्यात आली. त्यानुसार, शीघ्र कृती दलाच्या जवानांनी दुसऱ्या बाजूने पहिला माळा गाठला. त्याचवेळी पोलिसांनी आरोपीला खिडकीतून नोटांचे बंडल देण्यास सुरुवात केली. वरच्या माळ्यावर राजू यांची पत्नी, मुलगा आणि पुतणी यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नंतर आरोपीला नोटांचे बंडल देतानाच त्याचे हात धरून पोलिसांनी दार तोडत त्याला तसेच त्याने ओलीस ठेवलेल्या वैद्य कुटुंबातील दोन महिला आणि एक मुलगी अशा तिघांना बाहेर काढले.

----

प्रचंड तणाव

सिने स्टाईल कारवाई करून पोलिसांनी आरोपीला बाहेर काढल्यानंतर त्याची बेदम धुलाई करण्यात आली. यावेळी बघ्यांचा मोठा जमाव त्याच्याकडे धावला. मात्र, जमावाला पिटाळून पोलिसांनी त्याला आपल्या वाहनात घातले. त्याला हुडकेश्वर ठाण्यात नेऊन त्याची पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असतानाच, हजारावर नागरिक पोलीस ठाण्याच्या समोर जमले. जमाव ठाण्यात शिरल्यास मोठा गुन्हा घडू शकतो, हे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी त्याला तेथून मेडिकलच्या बहाण्याने गुन्हे शाखेत नेले. वृत्त लिहिस्तोवर तेथे त्याची चौकशी सुरू होती.

----

दोन तासानंतर सुटकेचा नि:श्वास

आरोपीने तब्बल दोन तास वृद्ध महिला आणि मुलीला ओलीस ठेवले. तो वारंवार त्यांच्या जिवाला धोका पोहोचविण्याची धमकी देत होता. दोन तासानंतर त्याला पोलिसांनी बाहेर काढले. घरातील कोणत्याही महिला-मुलीला कसलीही दुखापत झाली नसल्याचे कळाल्यानंतर पोलिसांसह सर्वांचाच जीव भांड्यात पडला आणि या थरारक घटनेवर पडदा पडला.

----