पुसदच्या तरुणाची तक्रार : इमामवाड्यात गुन्हा दाखल नागपूर : मोक्याची दोन एकर शेती केवळ ४० लाखात देतो, असे सांगून एका बिल्डरने पुसदच्या (जि. यवतमाळ) एका तरुणाचे ३५ लाख रुपये हडपले. विलास नारायण बेंचलवार असे आरोपीचे नाव आहे. तो एनआयटी कॉम्प्लेक्स, ५०४, आयुर्वेदिक लेआऊटमध्ये राहतो. फिर्यादी अजय विजयराव मानेकर (वय २९, रा. पुसद, जि. यवतमाळ) आणि आरोपी विलास बेंचलवार या दोघांची १५ जानेवारी २०१२ ला दुपारी ४ वाजता इमामवाड्यातील आदित्य बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स (हनी अर्चना अपार्टमेंट, उंटखाना) येथे भेट झाली होती. आरोपी बेंचलवारने यावेळी आपल्याला पैशांची नितांत गरज असल्याने खैरी (ता. उमरेड) येथील दोन एकर अकृषक जमीन केवळ ४० लाखात विकतो, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून मानेकरने आरोपीला पहिल्यांदा १२ लाख आणि नंतर दोन टप्प्यात २३ लाख असे एकूण ३५ लाख रुपये दिले. रक्कम घेतल्यानंतर आरोपीने शेतीची विक्री करून न देता घर सोडून पळ काढला. तो मोबाईलवरही प्रतिसाद देत नव्हता. (प्रतिनिधी)
बिल्डरने हडपले ३५ लाख
By admin | Updated: January 24, 2016 03:06 IST