शहरं
Join us  
Trending Stories
1
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
2
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
3
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
4
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
5
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
6
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
7
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
8
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
9
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
10
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
11
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
12
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
13
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
14
मतमोजणीपूर्वी १ जूनला INDIA आघाडीची बैठक बोलावण्यामागे खर्गे आणि काँग्रेसची अशी आहे रणनीती
15
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
16
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
17
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

सोमनाथच्या धर्तीवर राममंदिराची उभारणी करा : विहिंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 8:29 PM

अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी ही देशातील कोट्यवधी नागरिकांची भावना आहे. जर न्यायालयीन प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा. सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अध्यादेश जारी करुन राम मंदिराची उभारणी झाली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत हा मुद्दा ‘विहिंप’तर्फे मांडण्यात आला.

ठळक मुद्देआमदार, खासदारांना वैयक्तिक निमंत्रण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी ही देशातील कोट्यवधी नागरिकांची भावना आहे. जर न्यायालयीन प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा. सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अध्यादेश जारी करुन राम मंदिराची उभारणी झाली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत हा मुद्दा ‘विहिंप’तर्फे मांडण्यात आला.पत्रपरिषदेला विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ अध्यक्ष राजेश्वर निवल, आयोजन समितीचे अध्यक्ष संजय भेंडे, प्रांतमंत्री अजय निलदावार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे, संयोजक सनतकुमार गुप्ता, सहसंयोजक दिनेश गौर, ‘विहिंप’चे उपाध्यक्ष गोविंद शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. २५ नोव्हेंबर रोजी बंगळुरू व अयोध्या येथेदेखील हुंकार सभा होणार आहे. क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ३ वाजता ही सभा होईल. या सभेला ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, साध्वी ऋतुंभरा, देवनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, विहिपचे कार्याध्यक्ष आलोककुमार प्रामुख्याने उपस्थित राहतील. या सभेला विदर्भ व मध्य भारतातून एक लाख कार्यकर्ते येतील, असा विश्वास यावेळी सनतकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला.राममंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आतापर्यंत हिंदू समाजाने संयम ठेवला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर लगेच सुनावणी करण्यास नकार दिला. राममंदिराच्या मुद्याला प्राथमिकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या भूमिकेसंदर्भात आम्हाला कुठलेही भाष्य करायचे नाही. त्यामुळे आमचा केवळ इतकाच आग्रह आहे की, केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश पारित करून सोमनाथाच्या धर्तीवर अयोध्येत राममंदिर उभारावे. यासंदर्भात विहिपच्या राष्ट्रीय नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचे संजय भेंडे यांनी सांगितले.सर्व पक्षीय नेत्यांचे स्वागतया सभेसाठी कुठल्याही आमदार किंवा खासदारांना स्वतंत्रपणे विशेष निमंत्रण दिलेले नाही. हा मुद्दा जनभावनेशी जुळलेला आहे व जनप्रतिनिधींनी यात स्वत:हून सहभागी होणे अपेक्षित आहे. या सभेला सर्व पक्षाच्या नेत्यांचे स्वागत होईल. सर्वांसाठी ही सभा खुली आहे, असे संजय भेंडे यांनी स्पष्ट केले.मंचावर संघाचे पदाधिकारी राहणार नाहीसंघ परिवारातील स्वयंसेवकांनी हुंकार सभेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मंचावर संघाचे पदाधिकारी राहतील की नाही, हा प्रश्न कायम होता. मात्र ही सभा संतांच्या आदेशानुसार ‘विहिंप’च्या नेतृत्वात होत आहे. मंचावर संत व ‘विहिंप’चे कार्याध्यक्ष हेच राहतील, असे भेंडे यांनी स्पष्ट केले.आठ ठिकाणी ‘पार्किंग’ची व्यवस्थाविदर्भातून एक लाख कार्यकर्ता या सभेसाठी अपेक्षित आहेत. या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ‘पार्किंग’ची सोय आजूबाजूच्या परिसरातील आठ मैदानात करण्यात आली आहे. यात हनुमानगरचे चौकोनी मैदान, प्रोफेसर कॉलनी मैदान, बास्केटबॉल मैदान, मोहता विज्ञान महाविद्यालयाचे मैदान, एसबीसीटी महाविद्यालय मैदान, चंदन नगर मैदान, आयुर्वेदिक महाविद्यालय मैदान व जैन कलार भवन येथे ‘पार्किंग’ करता येणार आहे, असे सनतकुमार गुप्ता यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या