शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात

By admin | Updated: May 25, 2015 02:44 IST

महापालिकेचा २०१५-१६ या वर्षाचा अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. एलबीटीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

महापालिका : १५०० ते १६०० कोटीचे नियोजन?नागपूर : महापालिकेचा २०१५-१६ या वर्षाचा अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. एलबीटीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्प कमी रकमेचा राहणार असल्याचे संकेत आहे. २०१४-१५ या वर्षाचा अर्थसंकल्प १६४५ कोटीचा होता. यंदा १५०० ते १६०० कोटीचे नियोजन केले जाणार आहे.आयुक्तांनी १२५४ कोटीचा प्रस्तावित अर्थसंकल्प दिला आहे. त्या तुलनेत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे २५० ते ३०० कोटींचा वाढीव अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एलबीटी आॅगस्टपासून रद्द होणार आहे. परंतु पर्याय अद्याप निश्चित नसल्याने अर्थसंकल्पात एलबीटीपासून ६०० कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. उत्पन्नाचे प्रमुख स्रोत विचारात घेता प्रशासनाला ९०० कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. परंतु स्थायी समिती परंपरेनुसार यावेळी सुद्धा वाढीव अर्थसंकल्प मांडणार आहे. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सिमेंट रस्त्यासाठी ९० कोटीची तरतूद करण्यात आली होती. परंतु एलबीटीमुळे हा निधी उपलब्ध करताना अडचणी आल्या. सिमेंट रस्त्यासाठी सरकारकडून ३०० कोटी मिळाल्याने अर्थसंकल्पावर याचा भार राहणार नाही.मनपाने जेएनएनयूआरएम योजनेंर्तगत हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी भरीव तरतूद करावी लागणार आहे. तसेच लाडली लक्ष्मी योजना, स्मशानघाटाचा विकास, रस्ते, पूल व अर्धवट प्रकल्पांसाठी तरतूद करावी लागणार आहे. परंतु उत्पन्न विचारात घेता तरतूद करताना अध्यक्षांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. सोबतच नवीन घोषणा अपेक्षित आहे. त्यामुळे बीओटीवर प्रकल्प हाती घ्यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)